Video: वाईट, भ्रष्टाचाराच्या गोष्टी कानावर आल्या नाहीत, म्हणून मला तो…अण्णा हजारेंकडून फडणवीसांची स्तुती !

Anna Hajare: . समाजाच्या भल्यासाठी, राष्ट्राच्या भल्यासाठी ते मला आवडतो, असे कार्यकर्ते तयार झाले पाहिजे. त्यादृष्टीने देवेंद्र मला आवडतो.

  • Written By: Published:
anna hajare on devendra fadanvis

Anna Hajare ON Cm Devendra Fadanvis: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी लेट्सअपशी विशेष संवाद साधला. त्यात ते राज्य सरकार, केंद्र सरकारच्या कारभारावर बोलले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadanvis) यांचा कारभार चांगला असल्याचे पावती अण्णा हजारे यांनी दिलीय.

Maharashtra Government : खड्डे असतील, तर टोल नाही’; महाराष्ट्रात कार्यवाहीसाठी अभ्यास सुरू

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा फोन नाही येत. आमचा संबंध नाही. काही माणसं चांगलं काम करतात. त्यांना चांगलं म्हटलं पाहिजे. वाईट जे करतात त्यांना वाईट म्हटलं पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. त्यात देवेंद्र बरं काम करतोय. बाकी काही आमचा संबंध नाही. (Anna Hajare ON Cm Devendra Fadanvis)

आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय

देवेंद्र फडणवीसांना बरं म्हटल्यावर तुमच्यावर विरोधकावर टीका करतील, या प्रश्नावर अण्णा म्हणाले, असे मी होऊन बोलत नाही. प्रसंग वेळ आला तर तात्पुरता बोलतो. व्यक्ती म्हणून पक्ष, पार्टी म्हणून आपला काय संबंध नाही. मी सुरुवातीला मी गावात तेथे राहतो. ते कधी यायचे तेथे. मी तेथे बसतो, त्याच्या बाजूला खुर्चीत बसायचे. आजही एखादा शब्द टाकला तर मोडत नाही. समाजाच्या भल्यासाठी, राष्ट्राच्या भल्यासाठी तो मला आवडतो, असे कार्यकर्ते तयार झाले पाहिजे. त्यादृष्टीने देवेंद्र मला आवडतो. मुख्यमंत्री झाल्यापासून, मुख्यमंत्री होण्यापूर्वीही अजूनही वाईट कानावर आलेले नाही. भ्रष्टाचार माझ्या कानावर आला नाही. त्यामुळे तो मला आवडते. माणसांने मनुष्य जीवनात आल्यानंतर चांगल्या मार्गाने वागावे. ते चांगल्या मार्गाने जातात. म्हणून ते मला आवडतात, असे अण्णा म्हणाले.

फडणवीसांकडे गावाकडे काही मागितले होते या प्रश्नावर अण्णा म्हणातात, मी फकीर माणूस आहे. मागणी काय करायची. गावासाठी, समाजासाठी शक्य ते करतो. बाकी विशेष काही स्वतःसाठी मागत नाही.

follow us