आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात (Ganeshotsav 2025) कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी (Toll exemption) मिळणार आहे.
…म्हणून तेजस्विनीने सुरू केलं टेम्पल ट्रेलस! नव्या माध्यमातून करणार प्रेक्षकांचं मनोरंजन
गणेशोत्सवात दरवर्षी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत.
सुनेत्रा पवार RSSच्या कार्यक्रमात, रोहित पवार म्हणाले, ‘संघाच्या बैठकांना येण्याचा अजितदादांवर…’
शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच या संदर्भात जाहीरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दरमयान, २७ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार ६ सप्टेंबरला विसर्जन होणार असून राज्य सरकारने घेतलेला टोलमाफीचा हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी मोठा दिलासा देणार ठरणार आहे.