गणेशोत्सवात ढोल-ताशांचा नाद घुमणारच, एनजीटीच्या आदेशाला ‘सर्वोच्च’ स्थगिती
Supreme Court Stays NGT Order : पुण्यातील गणपती विसर्जनाच्या (Ganpati) मिरवणुकीत ढोल-ताशा पथकातील लोकांची संख्या 30 पर्यंत मर्यादित करण्याच्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (NGT) निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी स्थगिती दिली. न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा (Manoj Mishra) यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
फक्त घोषणा अन् जाहिरातबाजी प्रत्यक्षात मात्र..,; प्राजक्त तनपुरेंनी जुनं सगळं उकरुन काढलं
गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळातील ढोल + ताशा + झांज सदस्यांची एकूण संख्या 30 पेक्षा जास्त नसावी, असा निर्णय काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिला होता. ध्वनी प्रदुषण रोखणे हा या निर्णयाचा हेतू होता. मात्र, या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात आज (१२ सप्टेंबर) याप्रकरणी सुनावणी झाली. न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या सीजेआय डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने एनजीटीच्या निर्देशाला स्थगिती दिला. त्यांना ढोल वाजवू द्या.., असं म्हणत सरन्यायाधीशांना हसून हा निर्णय दिला.
मोठी बातमी : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दरम्यान, सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करणारे वकील अमित पै यांनी असा युक्तिवाद केला की- पुण्यासाठी गणेशोत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व आहे. गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी एनजीटीने जारी केलेल्या इतर निर्देशांमुळे अपीलकर्ते नाराज नाहीत. पण, एनजीटीच्या निर्देशाचा गणपती उत्सवादरम्यान ढोल-ताशा वाजवणाऱ्या मंडळांवर आर्थिक परिणाम होईल.
हा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 30 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात एनजीटीच्या निर्देशाला स्थगिती दिली.
एनजीटीचे निर्देश काय?
न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांच्या NGT खंडपीठाने 30 ऑगस्ट रोजी दिलेल्या आपल्या आदेशात पुढील निर्देश जारी केले-
(1) प्रत्येक जिल्ह्यातील MPCB (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) मंडळाने जवळच्या किमान 3 ठिकाणी रिअल टाईम ध्वनी निरीक्षण करणे
(2) पोलीस विभाग एमपीसीबीशी सल्लामसलत करून आणि शाळा/रुग्णालय/निवासी संकुलांच्या जवळचा विचार करून प्रत्येक गणेश मंडळाला लाऊड स्पीकरची क्षमता ठरवेल. (जास्तीत जास्त 100 वॅट)
(3) विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळातील ढोल + ताशा + झांज सदस्यांची एकूण संख्या 30 पेक्षा जास्त नसावी याची खात्री पोलीस विभाग करेल.