फक्त घोषणा अन् जाहिरातबाजी प्रत्यक्षात मात्र..,; प्राजक्त तनपुरेंनी जुनं सगळं उकरुन काढलं
MLA Prajatk Tanpure News : शेतकऱ्यांसाठी सरकारकडून फक्त घोषणा आणि जाहिरातबाजी केली जातेय, पण प्रत्यक्षात काम केलं जात नसल्याचं म्हणत माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलायं. आमदार तनपुरे यांची लेट्सअप मराठीच्या ‘लेट्सअप चर्चा’ या कार्यक्रमात मुलाखत पार पडली. या मुलाखतीत बोलताना तनपुरे यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरुन देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय.
आमदार तनपुरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊर्जा विभागाच्यावतीने अनेक योजना आम्ही राबवल्या. यामध्ये कृषी धोरण 2020 महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच आणलं गेलं. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर, रोहित्र, सब स्टेशनची तीव्रता वाढवण्याची कामे करण्यात आली. या योजनेचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला, मात्र महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांबद्दल अनास्था दिसून आलं असल्याची टीका तनपुरे यांनी केलीयं.
वर्षा बंगल्यावर CM शिंंदे अन् अजितदादांची खलबतं; जागावाटपासह ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
सध्या शेतकऱ्यांसाठी आम्ही वीजबिल माफ केल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांसाठी एसीएफच्या माध्यमातून ज्या योजना आणल्या, निधी आणला त्यावर अद्यापही कामे होऊ शकलेली नाहीत. शेतकऱ्यांसाठी शिल्लक असलेला 2 हजार कोटी रुपयांचा निधी तांत्रिक कारण दाखवून सत्ताधारी खर्च करु शकलेले नाहीत, याचा खेद वाटत असल्याचंही आमदार तनपुरे म्हणाले आहेत. याबाबत विधानसभेत अनेकदा भाषणादरम्यान उल्लेख केला पण सत्ताधाऱ्यांकडून उत्तरे दिली गेली नाही, विरोधकांना विश्वासान न घेता शेतकऱ्यांना फलदायी ठरणारी योजना बंद करण्यात आली असल्याचा आरोपही तनपुरेंनी यावेळी केलायं.
अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 25 सप्टेंबरपर्यंत वाढ
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना देवेंद्र फडणवीसांच्या काळात सुरु झाली होती. या योजनेला म्हणावी तशी गती मिळत नव्हती. अनेक प्रकल्पांची कामे पुढे जात नव्हती. हे प्रकल्प पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने या योजनांना गती दिली. अनेक प्रकल्प जे पाईपाईनमध्ये होते त्या प्रकल्पांना आम्ही गती दिली, असल्याचंही तनपुरे यांनी सांगितलंय.
सरकारकडून मविआ सरकारच्या योजना बंद पाडण्याचं पाप :
राहुरी मतदारसंघातील काही गावांत योजना सुरु झाल्या आहेत, पण काही गावांत अद्यापही योजनांची कामे सुरु झालेली नाहीत, हे दुर्देव असून हे स्वत:ला गतिमान म्हणवत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरु झालेल्या योजना अक्षरश: बंद पडल्या होत्या. आत्ता कुठेतरी त्या चालू होत असताना दिसून येत आहेत. फक्त घोषणा आणि जाहिराबाजी करायची, पण प्रत्यक्षात काम करायचं नाही, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरु झालेल्या योजना बंद पाडण्याचं पाप या सरकारने केलं असल्याचा गंभीर आरोपही तनपुरे यांनी यावेळी केलायं.