अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 25 सप्टेंबरपर्यंत वाढ
Arvind Kejriwal : दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Delhi Rouse Avenue Court) बुधवारी (11 सप्टेंबर) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) 25 सप्टेंबरपर्यंत वाढ केली. त्याचबरोबर दिल्ली न्यायालयाने मद्य धोरण प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते दुर्गेश पाठक यांना जामीन मंजूर केला आहे. पाठक यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
Yudhra Trailer 2: सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन स्टारर ‘युध्रा’चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित
सीबीआयने अरविंद केजरीवाल, दुर्गेश पाठक, विनोद चौहान, आशिष माथूर, सरथ रेड्डी यांच्याविरुद्ध राऊस ॲव्हेन्यू कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. 3 सप्टेंबर रोजी न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेत सर्व आरोपींना आज म्हणजेच 11 सप्टेंबरपर्यंत न्यायालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगितले होते. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यासह ताब्यात घेतलेले इतर लोक तिहार तुरुंगातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले होते.
‘…मग संकेत दूध प्यायला बारमध्ये गेला होता का?’, सुषमा अंधारेंचा बावनकुळेंना खोचक सवाल
जबाब नोंदवल्यानंतर न्यायालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. केजरीवाल यांच्या जामीनाला 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.आणि दुर्गेश पाठक यांना जामीन मंजूर केला.
उल्लेखनीय आहे की, ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने लढत आहेत. मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित कथित घोटाळ्यात आम आदमी पक्षाला बेकायदेशीर पैशांचा फायदा झाल्याचा सीबीआयचा आरोप आहे.
‘…मग संकेत दूध प्यायला बारमध्ये गेला होता का?’, सुषमा अंधारेंचा बावनकुळेंना खोचक सवाल
केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना यावर्षी 21 मार्च रोजी अटक केली होती. यानंतर जुलैमध्ये सीबीआयने या कथित घोटाळ्यात सीएम केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
दरम्यान, मद्य धोरण प्रकरणी केजरीवालांवर ईडी आणि सीबीआय खटला सुरू आहे. केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ईडी या प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला. असं असलं तरी सीबीआय प्रकरणात ते अजूनही तुरुंगात आहेत. आता त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 सप्टेंबरपर्यंत वाढ केली. त्यामुळं आता पुन्हा एकदा त्यांना 25 सप्टेंबरपर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे. यापूर्वी 27 ऑगस्ट आणि त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत 11 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती.
दुर्गेश पाठक यांचे भाजपवर आरोप
‘आप’चे नेते दुर्गेश पाठक यांनी जामीन मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलतांना भाजपवर टीका केली. खोट्या खटल्यांद्वारे पंतप्रधान मोदी आम आदमी पार्टीला नष्ट करू इच्छित असल्याचा आरोप त्यांनी केला. पण, आता सत्य बाहेर येत आहे. सर्वांना जामीन मिळत आहे आणि प्रत्येकजण तुरुंगातून बाहेर येत आहे, असं पाठक म्हणाले.