Sitaram Yechury : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचे निधन, वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. 

  • Written By: Published:
Letsupp Image   2024 09 12T160539.464

Veteran CPM leader Sitaram Yechury dies at 72 :  ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. येचुरी दीर्घकाळ आजारी होते. त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये (AIIMS) उपचार सुरू होते.

गुणरत्न सदावर्तें पुन्हा चर्चेत, ‘त्या’ प्रकरणात थेट राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार

सीपीएम सीताराम येचुरी यांना 19 ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तेव्हापासून ते लाइफ सपोर्ट सिस्टमवर होते. काही दिवसापूर्वी त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली होती मात्र नंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा एकदा एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनियासारख्या छातीत संसर्ग झाला होता. एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत देखरेख करत होती. सीताराम येचुरी यांच्या पश्चात पत्नी सीमा चिश्ती येचुरी आणि मुले अखिला आणि आशिष येचुरी असा परिवार आहे.

शरद पवारांच्या मोदींसमोर तीन मोठ्या अटी; म्हणाले, माझ्या गाडीत…

सीताराम येचुरी आणीबाणीच्या काळात तुरुंगात जाऊन राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. डाव्या पक्षांना आघाडीच्या राजकारणात आणण्याचे श्रेयही सीताराम येचुरी यांना जाते. यूपीए वन आणि यूपीए टूच्या काळात त्यांनीच डाव्या पक्षांना सरकारचा भाग होण्यास पटवून दिले होते. सीपीएमचे सरचिटणीस म्हणून एप्रिल 2015 मध्ये सीताराम येचुरी यांना जबाबदारी देण्यात आली होती तर 2016 मध्ये त्यांना राज्यसभेत सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला होता.

follow us