मोठी बातमी! CPI(M) सरचिटणीस सीताराम येचुरी यांची तब्येत बिघडली, एम्समध्ये दाखल
Sitaram Yechury : कम्युनिटी पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे सरचिटणीस आणि माजी खासदार सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांची तब्येत बिघडल्याने सोमवारी संध्याकाळी 6 वाजता दिल्ली एम्समध्ये (AIIMS) दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, न्यूमोनियामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सध्या त्यांच्यावर आपत्कालीन विभागाच्या रेड झोनमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
कोण आहेत सीताराम येचुरी?
सीताराम येचुरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस आहेत. त्यांना 2016 मध्ये राज्यसभा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला होता. ते 1974 मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) मध्ये सामील झाले होते आणि एका वर्षानंतर ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चे सदस्य झाले. जेएनयू विद्यार्थी असताना, आणीबाणीच्या विरोध केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.
अजित पवारांचा मोठा निर्णय, सना मलिक यांची प्रवक्ते पदावर नियुक्ती, फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष
1978 मध्ये, येचुरी हे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अखिल भारतीय संयुक्त संपादक बनले आणि नंतर त्यांची SFI चे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. ते पहिले अध्यक्ष होते जे केरळ किंवा पश्चिम बंगालचे नव्हते.