Mrunal Thakur : बॉलीवूडच नाही तर साऊथमध्येही मराठमोळ्या मृणालचा बोलबाला, ‘या’ चित्रपटात दाखवणार अभिनयाची जादू

Mrunal Thakur : मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) ही बॉलीवूडमधील (Bollywood) आघाडीची अभिनेत्री आहे. बॉलिवूडच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही मृणाल आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अलीकडेच तिचा ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ती लवकरच ‘डकैत’ (Dacoit) आणि ‘हाय जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात झळकणार आहे.
Maharashtra Government : खड्डे असतील, तर टोल नाही’; महाराष्ट्रात कार्यवाहीसाठी अभ्यास सुरू
खरंतर ज्या काळात ‘पॅन-इंडिया’ हा शब्द केवळ मार्केटिंगचे साधन बनला आहे, त्याच काळात मृणाल ठाकूरने तो एका वेगळ्याच अंदाजात सिद्ध करून दाखवला आहे. साऊथ इंडस्ट्री आणि बॉलिवूड दोन्हीमधील तिचे काम पाहता, तिने स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ‘सीता रामम’, ‘हाय नन्ना’, ‘जर्सी’, ‘लव्ह सोनिया’, ‘सुपर 30’, ‘द फॅमिली स्टार’ यांसारख्या चित्रपटांमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
मृणाल नेहमीच काहीतरी नवीन करण्यासाठी तयार असते आणि कधीही मागे हटत नाही. याच कारणामुळे ती बॉलिवूड आणि साऊथ दोन्हीकडे एक विश्वासार्ह अभिनेत्री ठरली आहे. दिग्दर्शकांना तिला त्यांच्या चित्रपटात घ्यायचे आहे आणि प्रेक्षक तिला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
Nitesh Rane : कणकवली बाजारपेठेतील नामचीन व्यक्तीच्या मटका अड्ड्यावर मंत्री नितेश राणे यांची धाड
जेथे बहुतेक कलाकार रातोरात त्यांची प्रतिमा आणि ब्रँड बदलण्याचा प्रयत्न करतात, तिथे मृणाल ठाकूरचा फिल्मी प्रवास खूप सहज राहिला आहे. एकाच प्रतिमेत अडकून न राहता, ती प्रत्येक भूमिकेसोबत स्वतःला नव्याने जुळवून घेते आणि प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांशी जोडली जाते.
बॉलिवूडमध्ये ती एक मनमिळाऊ आणि प्रयोगशील अभिनेत्री मानली जाते, तर साऊथमध्ये ती जुन्या चित्रपटांच्या जादूला आजच्या काळातील आकर्षणाची उत्तम जोड देते. फार कमी अभिनेत्री इतका चांगला समतोल साधू शकतात. मृणालची चित्रपटांची निवड दर्शवते की ती फक्त बॉलिवूड आणि साऊथमध्ये काम करत नाही, तर दोन्हीमध्ये एक मजबूत नातेसंबंध तयार करत आहे.
दरम्यान, ‘सन ऑफ सरदार 2’ मध्ये प्रेक्षकांची मन जिंकल्यानंतर, मृणाल ठाकूर आता ‘डकैत’ आणि ‘हाय जवानी तो इश्क होना है’ यांसारख्या चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे.