‘पुढल्या सर्जिकल स्ट्राइकसाठी शरद पवार आमच्यासोबत असतील’; पवार-मोदी भेटीनंतर राऊतांचा भाजपला इशारा

‘पुढल्या सर्जिकल स्ट्राइकसाठी शरद पवार आमच्यासोबत असतील’; पवार-मोदी भेटीनंतर राऊतांचा भाजपला इशारा

Sanjay Raut News : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी काल पुण्यात आले होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहू नये अशी विरोधी पक्षांची मागणी होती. त्यासाठी नेत्यांनी शरद पवार यांना विनंतीही केली होती. मात्र तरीही शरद पवार या कार्यक्रमाला हजर राहिले. यानंतर महाविकास आघाडीतून नाराजी असल्याची चर्चा आहे.

संभाजी भिडेवर कारवाई का होत नाही? काँग्रेस नेत्यानं दिलं धक्कादायक उत्तर

या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज राजधानी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शरद पवार आणि मोदींच्या कार्यक्रमासंदर्भात वाद झाले आहेत. पण आम्ह त्यावर पडदा टाकू. जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं, महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्राला कमजोर आणि अपमानित करण्याच प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राइक केला. हे पवार साहेबांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यामुळे पुढल्या सर्जिकल स्ट्राइकसाठी शरद पवार आमच्यासोबत नक्कीच राहतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, ज्या पद्धतीने पक्ष फोडले, गलिच्छ राजकारण केलं. हा महाराष्ट्रावर झालेला अन्यायच आहे. लोकांच्या मना प्रचंड असंतोष आहे. काल मोदी पुण्यात व्यासपीठावर होते पण जनता मात्र रस्त्यावर होती. लोकांच्या मनात खदखद कायम आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

आमदार शहाजीबापूंचं टेन्शन वाढणार? संभाजीराजे सांगोल्यात ‘स्वराज्य’ संघटना बांधणार

दरम्यान, काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.  या कार्यक्रमास शरद पवार यांनी हजर राहण्याचीच सर्वाधिक चर्चा होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube