मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते ओम राऊत (Om Raut) यांची निर्मिती असलेला ‘इन्स्पेक्टर झेंडे‘ (Inspector Zende) हा चित्रपट येत्या 5 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. 70-80 च्या दशकामध्ये कुख्यात ‘स्विमसूट किलर’ तिहार जेलमधून फरार होतो, तेव्हा एक शूर पोलिस अधिकारी त्याला पकडण्याचा निर्धार करतो, सत्य घटनेवर आधारित ही जिद्द आणि धाडसाची गोष्ट आहे.
शिक्षकानेच केलाय सात वर्षीय मुलीवर अत्याचार; चौघांना अटक, मुख्य आरोपी फरार..
‘इन्स्पेक्टर झेंडे ही गुन्हेगारी, विनोद यांना एकत्र जोडणारी कथा असून या चित्रपटात मनोज वाजपेयी इन्स्पेक्टर मधुकर झेंडेची भूमिका साकारत आहेत, तर जिम सर्भ कुख्यात स्विमसूट किलर कार्ल भोजराज या चलाख ठगाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन चिन्मय डी. मांडलेकर यांनी केले आहे. यात भालचंद कदम, सचिन केदकर, गिरिजा ओक आणि हरीश दुधाडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
दरम्यान, या चित्रपटाबाबत निर्माते ओम राऊत म्हणाले की, इन्स्पेक्टर झेंडेची कहाणी ही पाहिली पाहिजे, लक्षात ठेवली पाहिजे आणि सेलिब्रेट केली पाहिजे. ही एक अतिशय रोचक आणि प्रेरणादायी केसची कथा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे – इन्स्पेक्टर झेंडेवर चित्रपट बनवणे हे माझ्या वडिलांचे स्वप्न होतं. नेटफ्लिक्ससोबतच ही कथा पडद्यावर आणण्याचा प्रवास सुंदर आणि अद्भुत होता.
सरकारविरोधात कोणीही लढणार नाही, शरद पवार हे BJP चे हस्तक; आंबेडकरांचा आरोप
तर निर्माते जय शेवकरमणि म्हणतात, नेटफ्लिक्सचा हेतू आहे अशा अनोख्या आणि सत्यावर आधारित व्यक्तिरेखांच्या कथा संपूर्ण जगभर पोहोचवण्याचा. इन्स्पेक्टर झेंडे हे असेच एक हिरो आहेत, त्यांची ही गोष्ट सर्वांनी नक्की पाहिली पाहिजे.
नेटफ्लिक्स इंडियाच्या ओरिजिनल फिल्म्स संचालिका रुचिका कपूर शेख म्हणतात, इन्स्पेक्टर झेंडे ही पारंपारिक पोलिस विरुद्ध गुन्हेगाराच्या कहाणीला एक नवीन दृष्टीकोन देते. या कथेत गुन्हेगारी आणि विनोदाचं परिपूर्ण मिश्रण आहे. सत्य घटनेवर आधारीत या चित्रपटांच्या माध्यमातून चिन्मय डी. मांडलेकर हिंदी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. मनोज वाजपेयी आणि जिम सर्भ यांचा उत्कृष्ट अभियन बघायचा असेल तर हा चित्रपट पाहिला पाहिजे, असं त्या म्हणाल्या.
क्रेडिट्स
निर्माता: Northern Lights Films
प्रोड्यूसर्स: जय शेवकरमणि और ओम राउत
निर्देशक: चिन्मय डी. मांडलेकर
मुख्य कलाकार:
मनोज वाजपेयी, जिम सारभ, भालचंद्र कदम, सचिन केदकर, गिरीजा ओक और हरीश दूधाडे