Sunil Shroff Passed Away: सुप्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेते सुनील श्रॉफ यांचं निधन झालं आहे. (Sunil Shroff Death) परंतु त्याच नेमकं कारण काय? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. (Social media) ते गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची फक्त माहिती समोर आली आहे. सुनील श्रॉफ यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली असल्याचे दिसत आहे.
खिलाडीच्या ‘ओएमजी २मध्ये ते झळकले होते. हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला आहे. सुनील श्रॉफ यांनी अनेक हिंदी सिनेमात सहाय्यक अभिनेत्याची अनेकवेळा भूमिका साकारली होती. त्यांनी दिवाना, द्रोह काल, अंधा युद्ध, तथास्तु अशा हिंदीमधील हटक्या सिनेमामध्ये दमदार भूमिका साकारली होती. ते कायम मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात एक अनोखं स्थान निर्माण केले होते. त्यांचा मनोरंजनसृष्टीपर्यंचा प्रवास खूप खडतर काढला होता.
सुनील श्रॉफ यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. ते कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असायचे. इन्स्टावर ते कायम पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असत. गेल्या काही दिवसाखाली त्यांनी अभिनेता पंकज त्रिपाठीबरोबर फोटो शेअर केला होता. ते नेहमी आपल्या अपकमिंग प्रोजेक्टबद्दल इन्स्टा पोस्ट करत चाहत्यांना माहिती देत असत.
Sunil Shroff Passed Away: ‘ओह माय गॉड 2’ फेम अभिनेता सुनील श्रॉफ यांचे निधन
सुनील श्रॉफ यांनी सिनेमाचं नाही तर अनेक ब्रँडच्या जाहिराती देखील केले आहेत. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट १७ ऑगस्ट २०२२ दिवशी शेअर करण्यात आली होती. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत ते ईदवर आधारित भाईजानच्या गाण्यावर डान्स करत असल्याचे बघायला मिळत होते.