Sunil Shroff Passed Away: ‘ओह माय गॉड 2’ फेम अभिनेता सुनील श्रॉफ यांचे निधन

Sunil Shroff Passed Away: ‘ओह माय गॉड 2’ फेम अभिनेता सुनील श्रॉफ यांचे निधन

Sunil Shroff Death: बॉलिवूडला (Bollywood) आणखी एक धक्का बसला आहे. (Social media) ओह माय गॉड 2′ फेम अभिनेता सुनील श्रॉफ यांचे निधन झाले (Sunil Shroff Passed Away) आहे. गेल्या काही दिवसापासून सुनील श्रॉफ हे आजारी होते. नुकताच चाहत्यांच्या भेटीला आलेल्या ‘ओह माय गॉड 2’ या सिनेमात त्यांनी खिलाडीसोबत काम केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Shroff (@shroffuncle)

सुनील श्रॉफ यांनी अनेक हिंदी सिनेमात सहाय्यक अभिनेत्याची अनेकवेळा भूमिका साकारली होती. त्यांनी दिवाना, द्रोह काल, अंधा युद्ध, तथास्तु अशा हिंदीमधील हटक्या सिनेमामध्ये दमदार भूमिका साकारली होती. ते कायम मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात एक अनोखं स्थान निर्माण केले होते. त्यांचा मनोरंजनसृष्टीपर्यंचा प्रवास खूप खडतर काढला होता.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

सुनील श्रॉफ यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. ते कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असायचे. इन्स्टावर ते कायम पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असत. गेल्या काही दिवसाखाली त्यांनी अभिनेता पंकज त्रिपाठीबरोबर फोटो शेअर केला होता. ते नेहमी आपल्या अपकमिंग प्रोजेक्टबद्दल इन्स्टा पोस्ट करत चाहत्यांना माहिती देत असत.

Manik Bhide Death: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचं निधन

सुनील श्रॉफ यांनी सिनेमाचं नाही तर अनेक ब्रँडच्या जाहिराती देखील केले आहेत. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट १७ ऑगस्ट २०२२ दिवशी शेअर करण्यात आली होती. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत ते ईदवर आधारित भाईजानच्या गाण्यावर डान्स करत असल्याचे बघायला मिळत होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube