Download App

“राजवीर” च्या निमित्त, सुहास खामकरचे हिंदीत पदार्पण! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

Suhas Khamkar च्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे. "राजवीर" चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज

On the occasion of “Rajveer”, Suhas Khamkar’s Hindi debut! The film will be released on ‘this’ day : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला “राजवीर” हा आगामी हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे.

दसऱ्या-दिवाळीत आनंद नाहीच? ‘शिवभोजन’ही अडचणीत! ‘लाडकी बहीण’ मुळे तिजोरीवर ताण?

अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स, समृद्धी मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने “राजवीर” चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. साकार प्रकाश राऊत, ध्वनि साकार राऊत, गौरव परदासनी, सूर्यकांत बाजी चित्रपटाचे निर्माते, तर रुचिका तोलानी सूचक सहनिर्मात्या आहेत. साकार राऊत, स्वप्नील देशमुख यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन साकार राऊत, जेकॉब आणि पॉल कुरियन, माज खान यांनी केलं आहे. भूषण वेदपाठक यांनी छायांकन, अभिनंदन गायकवाड, होपून सैकिया यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात सुहास खामकरसह झाकीर हुसैन, गौरव परदासनी, प्राशी अवस्थी, धीरज सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ड्रेनेज लाईनच्या कामावेळी मातीचा ढिगारा कोसळला; अडकलेल्या 3 पैकी एका कामगाराला बाहेर काढण्यात यश

“राजवीर” या चित्रपटात एका आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. अत्यंत तडफदार व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहासनं राजवीर ही भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुहास खामकर अर्थातच “राजवीर”चा दमदार अभिनय दिसतो आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि सुहास खामकरचं तडफदार व्यक्तिमत्त्व पाहूनच चित्रपटाविषयी आता चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

follow us