ड्रेनेज लाईनच्या कामावेळी मातीचा ढिगारा कोसळला; अडकलेल्या 3 पैकी एका कामगाराला बाहेर काढण्यात यश

ड्रेनेज लाईनच्या कामावेळी मातीचा ढिगारा कोसळला; अडकलेल्या 3 पैकी एका कामगाराला बाहेर काढण्यात यश

Pile of soil collapsed during drainage line work; One of the 3 trapped workers was rescued : पुण्यातील सिंहगड रोड, नांदेड सिटीमध्ये एका ठिकाणी काम सुरू असताना 3 कामगार मातीच्या ढिगाऱ्याखालीअडकल्याची घटना घडली होती. यामध्ये आता एका कामगाराला बाहेर काढण्यात पुणे आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाला यश आलं आहे.

नेमकी घटना काय?

पुण्यातील सिंहगड रोड, नांदेड सिटीमध्ये नांदेड सिटी कंपाऊंड वॉलच्या बाहेरील बाजूस एका ठिकाणी हापालिकेच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरू होते. यावेळी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक मातीचा ढिगारा कोसळला होता. या ढिगाऱ्याखाली तीन कामगार अडकल्याचं धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी पुणे आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दल आणि पीडीआरएफच्या दलाच्या जवानांनी धाव घेतली.

लाल किल्ल्याच्या सुरक्षेत मोठी त्रुटी! दिल्ली पोलिस स्पेशल सेलच डमी बॉम्बसह प्रवेश, 7 कर्मचारी निलंबित

दरम्यान या दुर्घटनेतील 3 पैकी एका कामगाराला बाहेर काढण्यात पुणे आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दल आणि पीडीआरएफच्या दलाच्या जवानांना यश आलं आहे. या बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांना पुढील उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत अधिकृत माहिती ही अग्निशामक दलाचे अधिकारी प्रशांत गायकर यांनी दिली आहे.

पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग…

पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो पुणे, अहमदनगर (आता अहिल्यानगर) आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 133 किलोमीटर आहे आणि तो पूर्णपणे नवीन मार्गावर (ग्रीनफिल्ड) बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 1545 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार असून, मार्गावर 12 मोठे उड्डाणपूल आणि 9 इंटरचेंज असतील. महामार्गाची रचना चार पदरी (फोर लेन) असून, भविष्यात सहापदरी करण्याचीही तरतूद आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या