Download App

मानाचि लेखक संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेचे आयोजन

  • Written By: Last Updated:

Manachi Writers Association: ‘मानाचि लेखक संघटना’ अर्थात मालिका, नाटक, चित्रपट लेखकांनी, लेखकांची, लेखकांसाठी स्थापन केलेली संघटना, आपल्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त, छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्टच्या सहयोगाने, ‘ उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा ‘ आयोजित करीत आहे. या स्पर्धेची मूळ संकल्पना मानाचिचे संस्थापक सदस्य, सुहास कामत यांची आहे.

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, या स्पर्धेत सहभागी होणारी प्रत्येक टीम स्पर्धेच्या दिवशी एक चिठ्ठी उचलेल. त्यात खाली दिलेल्या विषयांपैकी एक विषय असेल. त्या विषयाच्या तयारीसाठी त्या टीमला एक तास दिला जाईल. एक तासानंतर त्या टीमला परीक्षकांसमोर, त्या विषयाचे दहा ते पंधरा मिनिटांचे इम्प्रोव्हायझेशन, तालीम स्वरूपात सादर करावे लागेल. त्या प्राथमिक फेरीतून, अंतिम फेरीसाठी निवडलेल्या टीम्सना त्यांच्याच विषयावरील एकांकिका योग्य संहिता, आवश्यक नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा प्रकाशयोजना व पार्श्वसंगीतासह सादर करावी लागणार आहे. सर्वश्री अभिजीत पानसे, केदार शिंदे, सतीश राजवाडे व अभिराम भडकमकर या ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शकांनी स्पर्धेसाठी दिलेले 20 विषय खालील प्रमाणे

Miss call, राम नाम सत्य है |, आलिया भोगासी…., देवाशपथ खरं सांगेन, तू तेंव्हा तशी, ही वाट दूर जाते…, माझे मन तुझे झाले, सुख कळले, राजकारण? नको रे बाबा, माझा पक्ष.. पितृपक्ष, A.I. (आर्टीफिशियल इंटेलिजन्स) आणि आम्ही, ⁠सिच्युएशनशिप (एक जोडपं नसलेल्या दोघांची, फ्रेंडशिप पलीकडली रिलेशनशिप), श्रद्धा सबुरी, संगीत मेरी आवाज सूनो (संगीत व्यंगनाट्य), बॉर्डर ( कोणत्याही बॉर्डवरचा दोन शत्रूंमधला मजेशीर संवाद) , आधुनिकतेच्या परिघावर, तुझे आहे तुजपाशी, आम्हास आम्ही पुन्हा पहावे, विरोध अंतर्विरोध, इन मिन तीन, असे 20 विषय असणार आहेत.

‘योद्धा’ चित्रपट आणि धर्मा प्रॉडक्शनसोबत काम करण्याचं राशि खन्नाचं स्वप्न साकार, अस का म्हणाली?

स्पर्धेची प्राथमिक फेरी 6 व 7 (शनिवार,रविवार) एप्रिल 2024 रोजी मुंबईत होईल. त्यातून निवडलेल्या एकांकिकांची अंतिम फेरी, सोमवार दिनांक 6 मे 2024 दिवशी मुंबईत श्री शिवाजी मंदिर, दादर येथे घेतली जाणार आहे. त्याच दिवशी अंतिम फेरीचा निकाल आणि रोख रक्कम व मानचिन्हे अशा घसघशीत पारितोषकांचे वितरणही केले जाईल. जास्ती- जास्त स्पर्धक संस्थांनी या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन मानाचि लेखक संघटनेच्या संचालक व सल्लागार मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.

follow us