Gumraah चा आणखी एक टीझर, मृणाल ठाकूरचा बेधडक अंदाज

मुंबई : अभिनेता आदित्य रॉय कपूर व अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या आगामी ‘गुमराह’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या सिनेमाच्या टीझरने आधीच प्रेक्षकांची एस्साइटमेंट वाढवली आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे. या ट्रेलरला पाहून दर्शक सिनेमाटी वाट पाहत आहेत. She's not afraid to go after what she wants. And what she […]

Gumrah

Gumrah

मुंबई : अभिनेता आदित्य रॉय कपूर व अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या आगामी ‘गुमराह’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या सिनेमाच्या टीझरने आधीच प्रेक्षकांची एस्साइटमेंट वाढवली आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे. या ट्रेलरला पाहून दर्शक सिनेमाटी वाट पाहत आहेत.

त्यानंतर आता या चित्रपटातील आणखी एक टीझर समोर आला असून यामध्ये मृणाल ठाकूरचा बेधडक अंदाज पाहायाला मिळत आहे. गुमराह एक ‘मर्डर मिस्ट्री’ फिल्म आहे. या सिनेमामध्ये आदित्य रॉय कपूरच्या व्यतिरिक्त मृणाल ठाकूर ही सिनेमात एका पोलिस इंसपेक्टरचा रोल करताना दिसत आहे. मृणालच्या व्यतिरिक्त यामध्ये रोनित रॉय देखील दिसत आहे. या सिनेमाच्याद्वारे पहिल्यांदा आदित्य आणि मृणाल एकत्र दिसून आले आहेत.

अजय देवगणच्या चाहत्यांना डबल बोनान्झा !

गुमराह हा तेलुगू सिनेमा ‘थडम’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हा सिनेमा 7 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य हा ‘द नाइट मॅनेजर’ या वेबसिरीजमध्ये दिसून आला होता. या वेबसिरीजमधील आदित्यच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले होते.

Exit mobile version