Download App

Parineeti Chopra Raghav Chadha : ठरलं तर! राघव परिणीतीची एंगेजमेंट होणार धुमधडाक्यात, Video Viral

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा आज नवी दिल्लीत साखरपुडा होणार आहे. नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांचा साखरपुडा होणार आहे. या शाही साखरपुड्याकडे सर्वच चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना आजवर अनेकवेळा स्पॉट करण्यात आले आहे. त्यांच्या डेटिंगच्या चर्चा देखील जोरदार रंगल्या आहेत. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर आज त्यांच्या साखरपुड्याचा दिवस उजाडला आहे. साखरपुड्यात खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक आणि शाही भोजन हे परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याचं विशेष आकर्षण राहणार आहे.


या सेलिब्रिटींच्या उपस्थितीत राहणार
मिळालेल्या माहितीनुसार, बहिणीच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा आपला पती निक जोनस आणि मालती मेरीसह दिल्लीत दाखल होणार आहेत. बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक करण जौहर हा देखील या साखरपुड्याला हजेरी लावणार आहे. राघव चड्ढा यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.


कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा होणार आहे. परिणीती-राघवसाठी आजचा दिवस खूप खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिणीती आणि राघव मॅचिंग आऊटफिट परिधान करणार आहेत. राघव यांचा आऊटफिट फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाइन केला आहे. तर परिणीतीचा बॉलिवूडचा लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला आहे.

लग्नाची नेमकी थीम काय?

परिणीती-राघव यांच्या साखरपुड्याला येणाऱ्या मंडळींसाठी पेस्टल रंगाची थीम ठरवण्यात आली आहे. परिणीती आणि राघव यांनी त्यांचं नातं अद्याप गुलदस्त्यात ठेवलं असलं तरी त्यांच्या साखरपुड्याच्या ठिकाणाचे, तयारीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहेत.

‘TMKOC च्या’ निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर आत्माराम भिडेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

शाही सोहळ्यात स्पेशल मेन्यू काय?

परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यात येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास मेजवानी राहणार आहे. अनेक पदार्थांची मेजवानी असणार आहे. परिणीती कबाब आवडत असल्याने मेन्यूमध्ये कबाबचा देखील समावेश करण्यात आला आहे. तसेच या साखरपुड्यात शाकाहारी मंडळींसाठी शाही भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक गोड पदार्थ देखील असणार आहेत.

Tags

follow us