‘TMKOC च्या’ निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर आत्माराम भिडेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 12T125638.010

Mandar Chandwadkar : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो (TMKOC) ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं (Jennifer Mistry Bansiwal) असित मोदी आणि सिरीयलच्या टीममधील इतर दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jennifer Mistry Bansiwal🧚‍♀️♾ (@jennifer_mistry_bansiwal)


जेनिफर मिस्त्री बंसीवालनं असित मोदी, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सिरीयलचे प्रोजेक्ट हेड सोहिल रमानी आणि एग्झीक्युटिव्ह प्रोड्यूसर जतिन बजाज यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला. यामुळे सध्या जेनिफर मिस्त्री बंसीवाल ही चर्चेत आहेत. आता या प्रकरणावर तारक मेहता का उल्टा चष्मा सिरीयलमधील आत्माराम भिडे ही भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar) यांनी आता उडी घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जेनिफर मिस्त्री बन्सीवालने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सिरीयलच्या निर्मात्यांवर लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर मंदार चांदवडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मंदार म्हणाले, ‘तिनं असे का केले? ते आम्हाला माहीत नाही. त्यांच्यात काय घडले याची मला कल्पना नाही. पण आमच्या सिरीयलच्या सेटवर फ्रेश आणि आनंदी वातावरण असते.

तसे नसले असते तर हा टीव्ही शो एवढा काळ चालू शकला नसता. जेनिफरने असित मोदीवर केवळ लैंगिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. असित मोदींशिवाय जेनिफरने प्रोजेक्ट हेड सोहिल रमाणी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सिरियलचे प्रोडक्शन हेड सोहिल रमानी यांनी जेनिफर मिस्त्री बंसीवालाने केले असलेले आरोप फेटाळले आहेत.

https://letsupp.com/entertainment/kubbra-sait-sepaks-about-doing-sex-scene-with-nawazuddin-siddiqui-in-sacred-games-46007.html

तसेच ते पुढे म्हणाले, ‘ही फक्त पब्लिसिटी आहे. असा छळ होत असेल तर तिने अगोदरच ऑथोरिटीजकडे जायला पाहिजे होते. आमच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये महिलांशी संबंधित सर्व समस्यांसाठी एक समिती आहे, आणि ती तिथेही महिला तक्रार करतात. आम्ही सर्व आरोपांना कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार आहोत. हा केवळ आमची, आमच्या शोची आणि आमच्या प्रॉडक्शन हाऊसची बदनामी करण्याचा मोठा डाव आहे.

Tags

follow us