Download App

Oscar 2024 : सिलियन मर्फी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले ख्रिस्तोफर नोलन

  • Written By: Last Updated:

Oscar Winner 2024 : जगभरातील चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे नुकतीच ऑस्कर पुरस्कारांची (Oscar Winner 2024) घोषणा झाली. गेल्या काही दिवसांपासून चाहते, समीक्षक, चित्रपट अभ्यासक हे या पुरस्काराची आतुरतेने वाट पाहत होते. आता ऑस्कर विजेत्यांची नावे जाहीर झाली आहेत. सिलियन मर्फीला (Cillian Murphy) ‘ओपेनहायमर’मधील (Oppenheimer) त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला आहे.

आजही अवकाळी पावसाची शक्यता कायम, ७ राज्यांना बसणार तडाखा, महाराष्ट्रात कसं असेल हवामान? 

ओपनहायमला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर
‘ओपनहायमर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला 13 नामांकनांसह यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वाधिक नामांकने मिळाली होती. त्यापैकी 7 पुरस्कार या चित्रपटाने पटकावले आहेत.

भास्करराव, मी तुम्हाला काका म्हणत होतो; जाधवांच्या सभेनंतर निलेश राणे हळवे 

सिलियन मर्फीला ‘ओपेनहायमर’मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला आहे. तर बार्बी चित्रपटातील ‘व्हॉट वॉज आय मेड फॉर?’ या गाण्यासाठी बिली इलिशने सर्वोत्कृष्ट ओरीजन गाण्याचा ऑस्कर जिंकला. ludwing Gorasnsson ला ‘ओपेनहाइमर’साठी यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ओरीजन स्कोअरचा ऑस्कर देण्यात आला.

द लास्ट रिपेअर शॉप ठरली सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म
‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साऊंडचा पुरस्कार मिळाला. तर ‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’ला सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार मिळाला. ‘द लास्ट रिपेअर शॉप’ने सर्वोत्कृष्ट डाक्युमेंटरीचा ऑस्कर जिंकला. बेन प्राउडफूट आणि ख्रिस बॉवर्स यांनी याचे दिग्दर्शन केले होते.

ऑस्कर विजेत्यांची नावे
सर्वोत्कृष्ट अभिनेता – सिलियन मर्फी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – ख्रिस्तोफर नोलन
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट – ‘द वॉर इज ओव्हर!’ इनस्पाय बाय द म्युझिक ऑफ जॉन अँड योको!
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म – द बॉय अँड द हेरॉन
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – ॲनाटॉमी ऑफ अ फॉल
सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा – अमेरिकन फिक्शन
सर्वोत्तम मेकअप – पुअर थिंग्स
प्रोडक्शन डिझाइन-पुअर थिंग्स
सर्वोत्तम पोशाख डिझाइन- पुअर थिंग्स
आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म – आवडीचे क्षेत्र
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – रॉबर्ट डाउनी ज्युनियर (ओपेनहायमर)
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म – द झोन ऑफ इंटरेस्ट
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – डावेन जॉय रँडॉल्फ (द होल्डओव्हर्स)
सर्वोत्कृष्ट एडिटींग – ओपनहायमर
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – ‘गॉडझिला मायनस वन’

जॉन सीना ऑस्करच्या स्टेजवर विवस्त्र अवस्थेत
या पुरस्कार सोहळ्यात एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जगप्रसिद्ध रेसलर आणि अभिनेता जॉन सीना ऑस्कर सोहळ्यात स्टेजवर नग्न अवस्थेत दिसला. जॉनने विवस्त्र अवस्थेत स्टेजवर येऊन पुरस्काराची घोषणा केली.

follow us