आजही अवकाळी पावसाची शक्यता कायम, ७ राज्यांना बसणार तडाखा, महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
Weather Forecast : अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं (Unseasonal rain) संकट तयार झालं आहे. हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (Western Disturbance) प्रभाव कायम आहे. त्यामुळे देशाच्या काही भागात आजही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. सोमवार (11 मार्च) पासून पुढील तीन ते चार दिवस उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. तर काही भागात गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे
भास्करराव, मी तुम्हाला काका म्हणत होतो; जाधवांच्या सभेनंतर निलेश राणे हळवे
गेल्या काही दिवसांत देशातील हवामानात मोठा बदल झाल्याचं चित्र आहे. वेस्टर्न डिस्टबर्न्सच्या प्रभावामुळे देशातील हवामान चक्र बदलले असून एकाच वेळी ऊन, पाऊस आणि थंडी पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. वायव्य सीमेवरून प्रवेश करणारे पश्चिमेचे वारे प्रामुख्याने उत्तर अरबी समुद्रातून येत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाच्या मादक अदा, चाहत्यांचं वेधलं लक्ष
11 ते 13 मार्चपर्यंत उत्तराखंड राज्यात हलक्या पावसासह हिमवृष्टीची शक्यता आहे. 12 आणि 13 मार्च रोजी पंजाबमध्ये आणि 13 मार्च रोजी राजधानी दिल्लीसह हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बलुचिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये येत्या ४ दिवसांत पावसाची शक्यता आहे. मात्र, महाराष्ट्रात पश्चिम वाऱ्याचा कोणताही प्रभाव राहणार नसून पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
महाराष्ट्रात तापमान वाढ
यापूर्वीह ऐन हिवाळ्यात अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीला अनेक भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पाऊसाने आणि गारपीटीने चांगलचं झोडपून काढलं होत. या पावसामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झालं. गेल्या आठवड्यापासून राज्यातून अवकाळी पावसाने माघार घेतली होती. त्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे.
उत्तर भारतात गारठा वाढला
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारीच्या अखेरीस तापमानात वाढ झाली होती, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस आणि जोरदार थंड वारे यामुळे तापमानात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या काही भागात सकाळ-संध्याकाळ थंडीचे वातावरण पाहायला मिळत आहे. डोंगराळ भागात सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात गारठा वाढला आहे.