Download App

Oscars 2024 : जॉन सीना नग्नावस्थेत पोहोचला ऑस्करच्या मंचावर, सर्वांचं वेधलं लक्ष; पाहा व्हिडिओ

  • Written By: Last Updated:

Oscars Awards 2024 : ऑस्कर अवॉर्ड्स (Oscars Awards) 2024 चा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 96 वा अकादमी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जिमी किमेल यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात WWE चा जगप्रसिद्ध रेसलर जॉन सीना याने देखील हजेरी लावली होती. धक्कादायक म्हणजे, जॉन सीना (John Cena) ऑस्कर सोहळ्यात स्टेजवर नग्न अवस्थेत दिसला. त्याने विवस्त्र अवस्थेत स्टेजवर येऊन पुरस्काराची घोषणा केली.

Oscar 2024 : सिलियन मर्फी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले ख्रिस्तोफर नोलन 

ऑस्करची घोषणा होत असताना, जिमी किमेलने एक जुन्या ऑस्कर सोहळ्याची आठवण काढली, तेव्हा सूत्रसंचाकल बोलत असताना पाठीमागून एक नग्न पुरूष धावत आला. जिमी किमेल बोलत असताना पीके चित्रपटातील आमिर खानच्या लूकप्रमाणे जॉन सीना ऑस्करच्या मंचावर कपड्यांशिवाय दिसला होता. जॉनचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

आजही अवकाळी पावसाची शक्यता कायम, ७ राज्यांना बसणार तडाखा, महाराष्ट्रात कसं असेल हवामान? 

ऑस्कर सोहळ्यात जॉन सीना कपडे न घालता आणि फक्त हातात एक लिफाफा घेऊन स्टेजवर पोहोचला होता. जॉन स्टेजवर येण्यापूर्वी, जिमी किमेलने ऑस्करची जुनी सांगितली. तो म्हणाला की, 1974 मध्ये झालेल्या 46 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एक अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच धक्का बसला. डेव्हिड निवेन एलिझाबेथ टेलरची ओळख करून देत असताना एक माणूस नग्न अवस्थेत रंगमंचावर धावताना दिसला होता. तेव्हा पुरस्कार सादर करतांना एक नग्न माणूस मंचावर धावत आला होता, आज अगदी त्याचप्रमाणे एक व्यक्ती येईल, असं जिमीने उपस्थितांना म्हटलं आणि जॉन सीनाने मंचावर एंट्री घेतली.

सुरुवातीला जॉन सीनान कपड्यांशिवाय स्टेजवर येण्यास नकार देतो. तो जिमीला बॅकस्टेजवरून बोलावतो. तो म्हणतो की तो स्टेजवर नग्न अवस्थेत येऊ शकत नाही, मग जिमी त्याला यायला सांगतो आणि जॉन बेस्ट कॉस्चुमच्या लिफाफ्याने आपलं प्रायव्हेट अंग झाकून मंचावर येतो. जॉन सीनाला अशा लूकमध्ये पाहून सगळे जोरजोरात हसायला लागतात. जॉन सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी ‘पुअर थिंग्ज’च्या डिझायनर हॉली वॉडिंग्टला पुरस्कार जाहीर झाल्यचाी घोषणा करतो. त्यानंतर जॉन सीनावर पडदा टाकून त्याला झाकलं जातं आणि कॉस्च्युमचं महत्वं हेच असल्याचं म्हटलं जातं.

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याशी जॉन सीनाचाही संबंध आहे. कारण आठ श्रेणींमध्ये नामांकन मिळालेल्या ‘बार्बी’ चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. काही आठवड्यांपूर्वी, जॉनने एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्याच्या एजन्सीने त्याला ‘बार्बी’मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका न करण्याचा सल्ला दिला होता. मी वस्तू नाही. मी एक माणूस आहे आणि मी प्रत्येक संधीवर काम करतो. त्यामुळं मला ही संधीही महत्वाची वाटल, असं त्यांने स्पष्ट केलं होतं.

follow us

संबंधित बातम्या