पा. रंजीत यांच्या ‘वेट्टुवम’ची मोठी घोषणा, 18 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता उलगडणार चित्रपटाची झलक

प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक पा. रंजीत यांनी आपल्या पहिल्या पॅन-इंडिया चित्रपट ‘वेट्टुवम’ची घोषणा करत आजची मोठी बातमी दिली आहे.

Untitled Design   2026 09 18T092441.135

Untitled Design 2026 09 18T092441.135

Pan-India film ‘Vettuvam’ announced : ‘कबाली’, ‘काला’, ‘थंगलान’ आणि ‘सरपट्टा परंबराई’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक पा. रंजीत आता ‘वेट्टुवम’च्या माध्यमातून भव्य पॅन-इंडिया प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत! प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक पा. रंजीत यांनी आपल्या पहिल्या पॅन-इंडिया चित्रपट ‘वेट्टुवम’ची घोषणा करत आजची मोठी बातमी दिली आहे. आकर्षक पोस्टरसह या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, त्याची एक झलक पाहताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

पा. रंजीत आपल्या या चित्रपटातून आतापर्यंतच्या सर्वात भव्य पॅन-इंडिया तमिळ चित्रपटांपैकी एक साकारत असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या अनोख्या दृष्टिकोनातून आणि वैशिष्ट्यपूर्ण सिनेमॅटिक शैलीतून एक दमदार कथा प्रेक्षकांसमोर येण्याचे संकेत मिळत आहेत. हा चित्रपट अत्यंत वेगळा आणि रंजक अनुभव देणारा ठरणार असून, प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही न पाहिलेली अशी एक नवी सिनेमॅटिक दुनिया या चित्रपटातून उलगडणार असल्याची अपेक्षा आहे. सध्या चित्रपटाचे केवळ पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असले, तरी या एका झलकनेच ‘वेट्टुवम’च्या वेगळेपणाची प्रचिती दिली आहे.

हा चित्रपट एका पारंपरिक भारतीय खेळाशी संबंधित असल्याचे पोस्टरवरून दिसून येत आहे. पोस्टरमध्ये मल्लखांबाची झलक पाहायला मिळत असून, त्यावर खेळाडू सराव करताना दिसत आहेत. भारताच्या इतिहासात रुजलेल्या मल्लखांब या पारंपरिक खेळाची कथा अनेक वर्षांनंतर चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक पा. रंजीत करत असल्याचे दिसते.

परतीच्या पावसाची चाहूल! महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज

मल्लखांब हा भारतीय उपखंडात उदयास आलेला एक पारंपरिक खेळ आहे. या खेळात खेळाडू उभ्या खांबाभोवती विविध कसरती करताना कुस्तीतील पकडींचा वापर करतात तसेच योग आणि जिम्नॅस्टिक्समधील विविध आसने सादर करतात. दरम्यान, ‘वेट्टुवम’च्या विश्वाची मोठी झलक उद्या, म्हणजेच 18 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजता प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे. अलीकडेच निर्मात्यांनी ‘वेट्टुवम’चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले आहे.

 

पा. रंजीत हे ‘कबाली’, ‘काला’, ‘सरपट्टा परंबराई’ आणि ‘थंगलान’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. ‘कबाली’ने जगभरात 320 कोटींहून अधिक कमाई करत त्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या तमिळ चित्रपटांपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले होते. तर ‘काला’ या चित्रपटाचा ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटच्या ‘Sight and Sound’ मासिकाच्या ‘21व्या शतकातील 25 चित्रपटां’च्या यादीत समावेश झाला होता. या यादीत स्थान मिळवणारा ‘काला’ हा एकमेव भारतीय चित्रपट ठरला होता.

अशा वेळी पा. रंजीत ‘वेट्टुवम’च्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतत असल्याने या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाचे विश्व भव्य स्वरूपात साकारण्यासाठी निर्माते मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. ‘वेट्टुवम’ हा चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पॅन-इंडिया स्तरावर प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version