Download App

‘एक अपघात अन्…’; पंकज त्रिपाठींच्या ‘कडक सिंग’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Pankaj Tripathi Upcoming Movie: आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रातील अनोखं स्थान निर्माण करणारे अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे सध्या त्यांच्या ‘कडक सिंह’ (Kadak Singh) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहेत. (Kadak Singh Movie) गेल्या काही दिवसापासून या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. आता या सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमधील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनायनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.


‘कडक सिंह’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी हे एके श्रीवास्तव ही भूमिका साकारत असल्याचे बघायला मिळणार आहे. एके श्रीवास्तवचा स्मृति गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याला काही गोष्टी आठवत नाही, असं जबरदस्त ट्रेलरमध्ये दिसत आहे. ‘कडक सिंह’ या सिनेमाचा ट्रेलर बघितल्यानंतर हा अंदाज लावला जात आहे की, हा संपूर्ण सिनेमा क्राईम थ्रिलर आधारित असणार आहे. ‘कडक सिंह’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या ट्रेलरमधील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाचं चाहते सर्वत्र कौतुक करत आहेत.

‘कडक सिंह’ हा सिनेमा 8 डिसेंबर 2023 दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा सिनेमा झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. पंकज त्रिपाठी यांचे चाहते या सिनेमाची मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. पंकज त्रिपाठी यांनी कडक सिंह सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यांनी ‘एक अपघात अन्… एक अस्पष्ट सत्य कडक सिंह सत्य शोधू शकणार का? ट्रेलर आऊट!”, असे कॅप्शन दिलं आहे,

Sangeet Devbabhali: 6 वर्षापूर्वी सुरु झालेलं ‘संगीत देवबाभळी’ नाटक आता घेणार निरोप

‘कडक सिंह’ या सिनेमामध्ये संजना संघीनं साक्षी श्रीवास्तव ही मुख्य भूमिका साकारली आहे. तर पार्वती टीनं या सिनेमात हेड नर्सची भूमिका साकारली आहे. ‘कडक सिंह’ सिनेमातील नैना ही भूमिका जया अहसाननं साकारली आहे. तसेच या सिनेमात दिलीप शंकर,परेश पाहुजा, वरुण बुद्धदेव या कलाकारांनी देखील मुख्य भूमिका साकारणार आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज