मुंबई : पनोरमा स्टुडीओज म्हणजे दृश्यम आणि दृश्यम 2 या चित्रपटांची निर्माती कंपनी. या कंपनीने आता दृश्यम आणि दृश्यम 2 या मल्याळम चित्रपटाच्या इतर भाषांतील रिमेकचे हक्क मिळवले आहेत.
अजय देवगणची मुख्य भूमिका आणि अभिषेक पाठकची जबरजस्त कथा यामुळे हा चित्रपट सुपरहीट झाला आहे. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई देखील केली आहे.
हेही वाचा : ऑल टाईम ब्लॉकबस्टर पठानची दुसऱ्या मंगळवारीही बॉक्सऑफीसवर पकड
आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जाहीर केले आहे की, पनोरमा स्टुडीओज इंटरनॅशनल एलटीडीने दृश्यम आणि दृश्यम 2 या मल्याळम चित्रपटाच्या इतर भाषांतील रिमेकचे हक्क मिळवले आहेत.
ते म्हणाले की, दृश्यम 2 (हिंदीमध्ये) च्या जबरदस्त यशानंतर, पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लि.ला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, त्यांनी मल्याळम भाषेतील दृष्यम 1 आणि दृष्यम 2 या चित्रपटांचे रिमेकचे सर्व भारताबाहेरील भाषांमध्ये म्हणजे इंग्रजीसह सर्व परदेशी भाषांमध्ये विकत घेतले आहेत.
परंतु फिलिपिनो, सिंहली आणि इंडोनेशियन वगळता. चित्रपटासाठी अनेक भाषांमधील अधिकार, तसेच दृष्यम 2 च्या चायनीज भाषेतील रिमेकचे हक्क देखील विकत घेतले आहेत. आम्ही आता कोरियन, जपान आणि हॉलीवूडमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी वाटाघाटी करत आहोत.