Download App

अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला ‘परंपरा’ चित्रपटाचा भावूक करणारा ट्रेलर प्रदर्शित

Parampara Trailer Released: समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या आशयसूत्रावर बेतलेला “परंपरा” हा (Parampara Movie) चित्रपट 26 एप्रिल दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मराठी सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज (Parampara Trailer) करण्यात आला आहे. (Marathi Movie) या ट्रेलरमध्ये उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत, आशयघन कथानक असलेल्या या सिनेमाबद्दल या ट्रेलरने मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.

हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत “परंपरा” या मराठी सिनेमाची निर्मिती केली असून फैजल पोपरे हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. तर दिग्दर्शन प्रणय निशाकांत तेलंग यांचे आहे. अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्यासह प्रकाश धोत्रे, अरुण कदम, नम्रता पावसकर, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमण, भूषण घाडी, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांचा दमदार अभिनय हे या मराठी सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील परंपरेच्या जपणुकीवर लक्ष केंद्रित करणारा हा मराठी सिनेमा आहे.

विशेषत: महाराष्ट्रातील, जिथे सांस्कृतिक वारसा खूप महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणारं कथानक या सिनेमात मांडण्यात आलं आहे. सिनेमाची पटकथा प्रणय निशाकांत तेलंग आणि संजय सावंत यांची असून छायाचित्र निशा तेलंग यांनी केले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना आनंद मेनन यांचे मधुर संगीत लाभले आहे. श्रीकांत तेलंग यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे. “परंपरा” एक समृद्ध सिनेमॅटिक अनुभव देण्यास तयार आहे.

Metro In Dino : ‘मेट्रो इन डिनो’ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली! समोर आलं मोठं कारण

एकंदरीत ‘परंपरा’ हा सिनेमा केवळ मनोरंजनच नाही, तर आजच्या काळातील बदलत्या जगात वारसा आणि परंपरेचे एक अतिशय महत्त्व दर्शवणारा सिनेमा आहे. शिवाय ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाचं जगणं, सामाजिक ताण याचं दर्शनही हा सिनेमा घडवतो. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला हा मराठी सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करेल यात काही शंका नाही.

follow us

वेब स्टोरीज