MyLek Trailer: माय- लेकची केमिस्ट्री उलगडणार..,’मायलेक’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

MyLek Trailer: माय- लेकची केमिस्ट्री उलगडणार..,’मायलेक’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

MyLek Trailer Released: ‘मायलेक’ (MyLek Movie) या नावावरूनच हा मराठी सिनेमा आई आणि लेकीच्या नातेसंबंधावर बेतलेला आहे, याची कल्पना आतापर्यंत सर्वांनाच आली असणार आहे. (Marathi Movie) रिअलमधील मायलेकींनी रिलमधील अनोखी कथा या मराठी सिनेमात बघायला मिळणार आहे. (Social media) नुकताच या मराठी सिनेमाचा हटके ट्रेलर (MyLek Trailer) रिलीज झाला असून हा एक कमाल कौटुंबिक सिनेमा असल्याचे सांगितले जात आहे.

या ट्रेलर लाँच सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अमृता खानविलकर, हर्षदा खानविलकर, संजय जाधव आदी मान्यवर हजेरी लावली होती. ट्रेलरमध्ये आई- लेकीचं सुपर बाँडिंग दिसत असतानाच त्यांच्या या सुंदर नात्यात दुरावा येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हा दुरावा का येतोय, यात उमेशची भूमिका काय? या ‘मायलेक’ पुन्हा एकत्र येणार, या आणि अशा अनेकांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहेत.

ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटाची सोनाली आनंद निर्माती असून या मराठी सिनेमात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद सहनिर्मिती या सिनेमाचे नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. आई आणि मुलीची सुंदर केमिस्ट्री ‘मायलेक’मधून बघायला मिळणार आहे.

Maidaan Movie: अजय देवगणच्या ‘मैदान’मधील ‘रंगा रंगा’ गाणं रिलीज

येत्या 19 एप्रिल दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबद्दल निर्माती, अभिनेत्री सोनाली खरे म्हणते, ”हा चित्रपट प्रत्येक आई- लेकीची गोष्ट सांगणारा आहे. खूप संवेदनशील असे हे नाते आहे. हे नाते कधी मैत्रीचे असते तर कधी एका अनोख्या वळणावर जाते. त्यामुळे हे नाजूक नाते उत्तमरित्या, विचारपूर्वक हाताळणे खूप महत्वाचे आहे. ‘मायलेक’मधून कोणताही संदेश देण्यात आलेला नसून तुमच्या आमच्या घरातील ‘मायलेकी’ची ही जोडी आहे.

ज्या धमाल, मजामस्ती करत आहेत. वाईट काळात मोठे निर्णय घेताना एकमेकींना साथ देखील देत आहेत. त्यामुळे ‘मायलेक’ तुम्हाला विशेषतः आईमुलीला खूप जवळचा वाटणार आहे. माझे आणि सनायाचे नातेही असेच आंबटगोड आहे. त्यामुळे पडद्यावर या व्यक्तिरेखा साकारणे सहज शक्य झाले. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज