Maidaan Movie: अजय देवगणच्या ‘मैदान’मधील ‘रंगा रंगा’ गाणं रिलीज

Maidaan Movie: अजय देवगणच्या ‘मैदान’मधील ‘रंगा रंगा’ गाणं रिलीज

Ranga Ranga Song Released: ‘शैतान’च्या अफाट यशानंतर अजय देवगण (Ajay Devgan) आता अमित शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ (Maidaan Movie) या चित्रपटात दिसणार आहे. (Ranga Ranga Song) या चित्रपटात अजयची जोडी प्रियमणीसोबत पहिल्यांदाच दिसणार आहे. (Social media) हा चित्रपट ईदच्या खास मुहूर्तावर म्हणजेच 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. याआधी निर्मात्यांनी ‘मैदान’ मधील ‘रंगा रंगा’ हे नवीन गाणे रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याला वैशाली सामंतने आवाज दिला आहे.

फुटबॉल कोचवर आधारीत आहे चित्रपट

या सिनेमात अजय देवगण भारतीय फुटबॉलचे संस्थापक मानले जाणारे फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहमान यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सय्यद अब्दुल रहमान यांनी 1950 ते 1963 पर्यंत भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत. ‘मैदान’मध्ये अजय देवगणशिवाय प्रियमणी आणि गजराज राव हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट बोनी कपूर आणि झी स्टुडिओच्या बॅनरखाली प्रदर्शित होणार आहे.

चार वर्षांपासून रखडला होता चित्रपट

मिळालेल्या माहितीनुसार मैदान चित्रपटाची घोषणा 2018 मध्ये करण्यात आली होती. 2019 मध्ये हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार अशी अपेक्षा होती. मात्र, या सिनेमाचे प्रदर्शन लांबले. त्यानंतर 2023 मध्ये ‘मैदान’ सिनेमा रिलीज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी त्याचा टीझरही लाँच करण्यात आला होता. मात्र, काही कारणास्तव पुन्हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर आता हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Main Ladega First Look: आकाश प्रताप सिंगच्या ‘मैं लादेगा’ चित्रपटाचे पहिलं पोस्टर रिलीज

कधी होणार रिलीज मैदान? 

मैदान सिनेमा हा ईदच्या दिवशी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणच्या या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार याकडे सिनेसृष्टीचे लक्ष लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज