Download App

Hera Pheri 3: ठरलं! बाबू भैय्या, श्‍याम अन् राजू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हेरा फेरी 3’बद्दल मोठी अपडेट समोर

Paresh Rawal On Hera Pheri 3: हिंदी सिनेमातील सर्वात गाजलेल्या सिनेमापैकी एक म्हणजे ‘हेरा फेरी'(Hera Pheri). परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिघांनी ‘फेरी हेरा फेरी’ (Phir Hera Pheri) मधून प्रेक्षकांना पोट धरुन हसवले. आता लवकरच सिनेमाचा तिसरा भाग देखील येणार आहे. ‘हेरा फेरी 3′ च्या (Hera Pheri 3) शूटिंगला लवकच सुरुवात होणार असल्याची माहिती परेश रावल (Paresh Rawal) यांनी यावेळी दिली.

एका मुलाखतीच्या दरम्यान परेश रावल यांना प्रश्न विचारण्यात आला की, ”हेरा फेरी’ सिक्वेल कधी रिलीज होणार आहे?. यावर परेश यांनी उत्तर दिलं आहे की, ‘हेरा फेरी 3’ चे शुटिंग मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. परंतु त्याअगोदर ‘वेलकम टू द जंगल’ बनत आहे. हा देखील खूप महागडा सिनेमा आहे. त्याचे शूटिंग सौदी अरेबियात होणार आहे’. आता या सिनेमाचा तिसऱ्या भागाची प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहे.

मिळालेल्या माहितीनुसा, ‘फिर हेरा फेरी’ सिनेमाची कथा जिथे संपली, त्याच्या पुढे ‘हेरा फेरी 3’ सुरू होणार आहे. राजू, श्याम आणि बाबूराव ही तीन पात्र बंदूक आणि माफियांच्या कचाट्यात अडकताना बघायला मिळणार आहेत. ‘हेरा फेरी 3’ मध्ये एका नवीन पात्राची भर पडली आहे. आता अभिनेता संजय दत्त देखील गँगस्टरच्या भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अक्षयला ‘हेरा फेरी 3’ सिनेमाची पटकथा आवडली नसल्यानं यातून त्यानं काढता पाय घेतल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी कार्तिक आर्यनला हा राजूची भूमिका साकारणार अशी चर्चा सुरु झाली होती. परंतु, आता ‘हेरा फेरी 3’ मध्ये राजू ही भूमिका अक्षय कुमारचं साकारणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; गणेश देवी, जिग्रेश मेवाणी, राजू बाविस्कर ठरले मानकरी!

हेरा फेरीचा तिसरा भाग येणार म्हणून चाहते देखील खूप खूष आहेत. हेरा फेरी 2 हजार साली रिलीज झाला होता तर फिर हेरा फेरी 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिला हेरा फेरी येऊन तब्बल 22 वर्ष झाली आहेत. मात्र या सिनेमाची क्रेझ अजुन देखील कायम आहे. आता पुन्हा एकदा बाबू भैय्या, राजू आणि श्याम पुन्हा एकदा चाहत्यांना हसवायला लवकरच येणार आहेत.

Tags

follow us