Parineeti Chopra: अखेर ठरलं! ‘या’ दिवशी होणार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा सारखपुडा

Parineeti Chopra And Raghav Chadha Engagement: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (parineeti chopra ) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा (raghav chadha) यांच्या लग्नाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा रंगल्या होत्या. परिणीती आणि राघव चड्ढा यांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. आता परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाविषयी मोठी माहिती समोर आली आहे.   […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 02T170341.309

Parineeti Chopra

Parineeti Chopra And Raghav Chadha Engagement: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (parineeti chopra ) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा (raghav chadha) यांच्या लग्नाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा रंगल्या होत्या. परिणीती आणि राघव चड्ढा यांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. आता परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाविषयी मोठी माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. १३ मे रोजी नवी दिल्लीत या दोघांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या परिणीती आणि राघव दोघे देखील त्यांच्या कामात प्रचंड व्यस्त आहेत. परिणीती आणि राघव लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लग्नाच्या चर्चांविषयी कोणतीही अधिकृत माहिती परिणीती आणि राघव चड्ढा यांच्याकडून मिळालेली नाही. पण, परिणीती आणि राघव चड्ढा ६ महिन्यामध्ये म्हणजेच २०२३ च्या ऑक्टोबर महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी परिणीतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

त्या व्हिडीओमध्ये तिच्या हातात अंगठी दिसत होती. तिच्या हातात अंगठी बघून परिणीती आणि राघव यांनी गुपचूप साखरपुडा केला असावा, अशी शक्यता चाहत्यांकडून वर्तवण्यात येत होती. परिणीती चोप्राची बहीण आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील गेल्या काही दिवसा अगोदर भारतात आली होती. परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर ती भारतात आल्याचे सांगितले जात होते.

Exit mobile version