Parineeti Chopra: काय म्हणता… राघव चड्ढा- परिणीतीने साखरपुडा उरकला?; ‘त्या’ फोटोवरुन चर्चांना उधाण

Parineeti Chopra Raghav Chaddha Engaged: अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chaddha) या दोघांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. महिनाभरापूर्वीच ते मुंबईमध्ये सतत एकत्र दिसत होते, (Parineeti Chopra Raghav Chaddha Engaged) लवकरच ते लग्न करणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. अशातच हे दोघे आयपीएलचा सामना बघायला स्टेडियममध्ये गेले […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 05T171704.227

Parineeti Chopra

Parineeti Chopra Raghav Chaddha Engaged: अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chaddha) या दोघांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. महिनाभरापूर्वीच ते मुंबईमध्ये सतत एकत्र दिसत होते, (Parineeti Chopra Raghav Chaddha Engaged) लवकरच ते लग्न करणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. अशातच हे दोघे आयपीएलचा सामना बघायला स्टेडियममध्ये गेले होते. आम आदमी पार्टीचे खासदार राघव आणि परिणीतीला एकत्र बघून क्रिकेट चाहत्यांनी स्टेडियमच दणाणून सोडले आहे.

दरम्यानचा या दोघांचा फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोवरून दोघांचा साखरपुडा झाला की काय, असा सवाल चाहते विचारत आहेत. या फोटोंमध्ये परिणीती राघव यांच्या अगदी जवळ- जवळ उभे आहेत. राघव यांच्या खांद्यावर डोके ठेवून ती मॅच बघत असलयाचे दिसून येत आहे. या फोटोंमध्ये परिणीतीच्या हातामध्ये अंगठी दिसत आहे. त्यावरून या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाली असल्याची बातमी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिली होती. १३ मे रोजी नवी दिल्लीमध्ये या दोघांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या परिणीती आणि राघव दोघेही त्यांच्या कामात प्रचंड व्यस्त आहेत. आता या फोटोमुळे त्यांचा साखरपुडा झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दरम्यानचा आयपीएल सामना बघण्यासाठी पंजाब क्रिकेट असोसिएशन मोहालीत पोहोचलेल्या राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. दोघांचे अनेक फोटो समोर आले आहेत, पण व्हिडीओ मात्र खूपच मजेदार दिसत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव स्टेडियममध्ये चाहत्यात उभे असल्याचे दिसत आहे. या वेळी परिणीती चोप्राला बघून चाहत्यांनी ‘परिणीती भाभी जिंदाबाद’च्या जोरदार घोषणा देत होते.

Exit mobile version