Parineeti Raghav Wedding Card : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. दोघेही याच महिन्यात लग्न करणार आहेत. लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे लग्न उदयपूरच्या हॉटेल लीला पॅलेसमध्ये होणार आहे. 24 सप्टेंबरला पंजाबी रितीरिवाजांनुसार हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे.
लग्नाचे कार्यक्रम कधी होणार?
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नपत्रिकेनुसार लग्नाचे कार्यक्रम 23 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 24 सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत. हे कपल उदयपूरमधील हॉटेल लीला आणि ताज लेक पॅलेसमध्ये फेरे घेणार आहे. या कपलने त्यांच्या संगीतासाठी 90 च्या दशकाची थीम देखील ठेवली आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या कार्यक्रम असे आहेत:
चुडा समारंभ- 23 सप्टेंबर, सकाळी 10:00 वा
संगीत- 23 सप्टेंबर, संध्याकाळी 7:00 वा
राघवची सेहराबंदी- 24 सप्टेंबर, दुपारी 1:00 वा
बारात- 24 सप्टेंबर, दुपारी 2:00 वा
जयमाला- 24 सप्टेंबर, दुपारी 3:30 वा
फेरे- 24 सप्टेंबर, दुपारी 4:00 वा
विदाई- 24 सप्टेंबर, संध्याकाळी 6:30 वा
रिसेप्शन- 24 सप्टेंबर, रात्री 8:30 वा
राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत होत्या. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. या जोडप्याने यावर्षी 13 मे रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये सगाई केली होती. तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.
परिणीती आणि राघव यांची लव्ह स्टोरी
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर दोघेही खूप जुने मित्र आहेत. दोघांनीही इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले आहे. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. तर राघव चढ्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. परिणीती आणि राघव यांना इंग्लंडमधील भारत यूके आऊटस्टँडिंग अचिव्हर्स अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले होते. 2022 पासून त्यांच्यातील जवळीक वाढली. त्यानंतर परिणीती पंजाबमध्ये ‘चमकिला’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्यानंतर राघव चढ्ढा परिणीतीला भेटण्यासाठी चित्रपटाच्या सेटवर जात असे.