Download App

Wedding ठरलं! ‘या’ दिवशी परिणीती होणार ‘मिसेस चड्डा’; राजस्थानमध्ये शुभमंगल सावधान पडणार पार

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांची सध्या जोरदार लगीनघाई सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचा अखेर शुभमुहूर्त ठरला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शुभविवाह २३ आणि २४ सप्टेंबर दिवशी पार पडणार आहे. या दोघांनी डेस्टिनेशन वेडींगसाठी राजस्थान राज्याची निवड केली आहे.


उदयपूरमधील आलिशान हॉटेलमध्ये लग्नाच्या विधींकरिता बुकींग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यापासूनच चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची चांगलीच आतुरता लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्या लग्नाचे अनेक वेगवेगळे कार्यक्रम आणि विधी २३ आणि २४ सप्टेंबर या दिवशी पार पडणार आहेत. याकरिता उदयपूरमधील शानदार हॉटेल लीला पॅलेस बुकींग करण्यात आले आहे.

तसेच हॉटेल उदयविलास येथे लग्नाचे विधी पार पडणार आहेत, आणि येथे पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. तसेच २२ तारखेपासून पाहुण्यांचं आगमन सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या लग्नसोहळ्याची तयारी सध्या जोरदार सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. २३ सप्टेंबरपासून मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रम सुरु होणार आहेत.

Jilbi Movie: प्रसाद ओक घेऊन येतोय; गोडवा वाढवणारी ‘जिलबीची’ स्टोरी

परिणीती आणि राघव यांचा १३ मे दिवशी दिल्लीमध्ये साखरपुडा करण्यात आला होता आणि आता त्यांचं लग्न होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या लग्नाला राजकारणी आणि अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याचे बघायला मिळणार आहे.

Tags

follow us