Parineeti Chopra Raghav Chadha या आठवड्यात करणार साखरपुडा? दिल्लीत तयारी झाली सुरू

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि ‘आप’चे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चेला उधाण येत आहे. मुंबईत दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. गेल्या ६ महिन्यांपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. आता एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांचा साखरपुडा होणार असल्याची […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 04T100051.662

Parineeti Chopra Raghav Chadha

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि ‘आप’चे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चेला उधाण येत आहे. मुंबईत दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. गेल्या ६ महिन्यांपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. आता एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार परिणीती आणि राघव यांचा लवकरच साखरपुडा होणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा साखरपुडा होऊ शकतो. अद्याप दोघांनीही यासंदर्भात अधिकृत माहिती दिली नाही. परिणीती आणि राघवच्या साखरपुड्याच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. पुढच्या आठवड्यात दिल्लीत त्यांचा साखरपुडा होणार असल्याची चर्चा रंगत आहे.


परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडणार आहे. बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंचा चोप्रा, निक जोनस आणि त्यांची कन्या मालती देखील या साखरपुड्याला उपस्थित असणार आहे. मीरा कपूर देखील या साखरपुड्याला हजेरी लावणार असल्याची चर्चा होत आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jan चं आणखी एका गाण्याचा टीझर आला, सलमानचा लुंगी अवतार

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना नुकतचं मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे. विमानतळावरील दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता नवी दिल्लीत त्यांचा साखरपुडा होणार असून दोघांच्याही घरी लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘चश्मिश’ असं लिहिले आहे. राघव चढ्ढा यांना चश्मा असल्याने चाहत्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे की,तू राघव चढ्ढा यांना चश्मिश म्हणतेस का? असा सवाल केला जात आहे.

Exit mobile version