Parineeti Raghav Wedding: परिणीती राघवच्या लग्नासाठी चोख बंदोबस्त; पाहुण्यांसाठी फोनवर…

Parineeti-Raghav Wedding: परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे. दिल्लीमध्ये परिणीती-राघव यांचा मेहंदी सोहळा पार पडला. ज्याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. हा गुरुद्वाराचा फोटो असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये परिणिती तिच्या हातावर मेहंदी बघायला मिळाली. परिणीती आणि राघवच्या लग्नाचे […]

Parineeti – Raghav

Parineeti – Raghav

Parineeti-Raghav Wedding: परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे. दिल्लीमध्ये परिणीती-राघव यांचा मेहंदी सोहळा पार पडला. ज्याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. हा गुरुद्वाराचा फोटो असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये परिणिती तिच्या हातावर मेहंदी बघायला मिळाली. परिणीती आणि राघवच्या लग्नाचे काही फंक्शन दिल्लीमध्ये होणार आहे.

२४ सप्टेंबर दिवशी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नाची तयारी देखील जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघे उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होवू नये म्हणून चोख बंदोबस्त देखील लावण्यात येणार आहे. पाहुण्यांच्या मोबाईलवर निळ्या रंगाची टेप लावण्यात आली आहे. परिणीती आणि राघवचे लग्न खूप ग्रँड होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.


या कपलच्या लग्नात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांव्यतिरिक्त बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्तीचा थाट बघायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत पाहुण्यांच्या स्वागतासाठी शाही व्यवस्था देखील करण्यात आली आहे. परिणीती आणि राघवच्या लग्नाचे विधी दिल्लील लीला पॅलेस आणि ताज पॅलेस हॉटेलमध्ये होणार आहेत.

Lalbaugh Raja: किंग खान मुलासोबत घेतला लालबाग राजाचं दर्शन

२३ सप्टेंबर दिवशी परिणिती चोप्राचा चुडा भरण्याचा कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार आहे. २३ सप्टेंबरला पाहुण्यांसाठी ९० च्या थीमवर आधारित पार्टी आणि संध्याकाळी ७ वाजता आयोजित कार्यक्रम होणार आहेत. २४ सप्टेंबरला दुपार १ वाजता राघव चड्डा यांना सेहराबंदसाठी जाणार आहे. २४ ला वाजत गाजत वरात घेऊन राघव लग्नाच्या ठिकाणी येणार. २४ सप्टेंबरला दुपार ३.३० वाजता जयमाला होतील आणि त्यानंतर लगेच ४ वाजता दोघे फेरे घेतील. २४ ला संध्याकाळी ६.३० वाजता परिणीतीची पाठवणी करण्यात येणार. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा रात्री ८ वाजता लीला पॅलेस हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन देण्यासाठी हजारी लावणार असल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version