Download App

Parineeti Chopra: लग्नाची दणक्यात तयारी सुरु? साखरपुड्याच्या चर्चांमध्ये मनीष मल्होत्राच्या घरी पोहचली परिणीती

  • Written By: Last Updated:

Parineeti Chopra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या डेटिंगची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) सुरु आहे. काही दिवसांपूर्वी हे राघव चढ्ढा आणि परिणीती हे दोघं एकत्रित डिनर करताना दिसून आले होते.

त्यानंतर काही दिवसांनी लंचसाठी देखील ते एकत्र गेले होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या बातम्याही येत आहेत. या अफवाच्या दरम्यान, परिणीती बुधवारी रात्री प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या (Manish Malhotra) घरी दिऊन आली आहे. तर दुसरीकडे, मनीषच्या घरी स्पॉट झाल्यानंतर परिणीती आणि राघवच्या लग्नाच्या अफवांना जोर आला आहे.


यामुळे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत परिणीती काळ्या रंगाच्या क्रॉप टॉपसोबतच पांढरा फॉर्मल पॅंटसूट परिधान करत असताना दिसून आली आहे. अभिनेत्री परिणीती चोप्राचा हा लुक मॅचिंग चिक हँडबॅग आणि ब्लॅक हिल्ससह जोडण्याचा प्रयत्न केला आहे. कारमधून उतरल्यानंतर लगेचच अभिनेत्री पापाराझींसाठी पोज देत असल्याचे दिसून आली दिसली.

Insidious The Red Door चा ट्रेलर रिलीज, राक्षसांच्या जगात पुन्हा गेले जोश-डाल्टन

दरम्यान पापाराझींसाठी पोज देत असताना लाजताना दिसली आहे. तसेच पापाराझींनी तिला लग्नाबद्दल सवाल देखील विचारले. लग्नाचे सवाल करताच ते टाळण्यासाठी ती पटकन मनीषच्या घरात जात असल्याचे दिसली आहे.

Tags

follow us