Insidious The Red Door चा ट्रेलर रिलीज, राक्षसांच्या जगात पुन्हा गेले जोश-डाल्टन

Insidious The Red Door चा ट्रेलर रिलीज, राक्षसांच्या जगात पुन्हा गेले जोश-डाल्टन

Trailer Out of Insidious The Red Door: पॅट्रिक विल्सन यांची हॉरर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इनसिडियस’ त्यांच्या या फ्रेंचाईजीमधील ‘इनसिडियस: द रेड डोर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. विल्सन यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली होती. तर आता या चित्रपटाचा हॉरर आणि थ्रिलर ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘इनसिडियस: द रेड डोर’ च्या या ट्रेलरवरून हे स्पष्ट दिसत आहे की, राक्षसांना पुन्हा एकदा शांत करण्यासाठी जोश (पॅट्रिक विल्सन) आणि डाल्टन (टाइ सिम्पकिंस) यांना आपल्या कुटुंबाच्या भुतकाळात जावे लागते. त्यात अनेक भयावह ठिकाणांमध्ये अडकल्याचं पाहायला मिळतात. मात्र जेव्हा आणखी खोलात जातात तेव्हा काय होते त्याची हा रोमांचक कथा आहे.

इनसिडियसच्या मुख्य अभिनेते पॅट्रिक विल्सन यांनी या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात आपला डेब्यू करणार आहे. तसेच या चित्रपटात टाय सिम्पकिंस, रोज बायरन आणि एंड्रयू एस्टोर यांसारखे कालाकारही दिसणार आहेत. जेसन ब्लम, ओरेन पेली, जेम्स वान आणि लेह व्हेननेल ‘इनसिडियस: द रेड डोर’ चे निर्माते आहेत. तर स्क्रीनप्ले स्कॉट टेम्स यांनी केला आहे. लेह व्हेननेल यांनी ही कहानी लिहिली आहे.

Aaradhya Bachchan हिच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने गूगल, यूट्यूबला बजावलं समन्स

‘इनसिडियस: द रेड डोर’, इंसिडियस फ्रेंचाईजीचा पाचवा चित्रपट आहे. तर राक्षसांच्या जगाची ओळख करून देणाऱ्या ‘इनसिडियस: द रेड डोर’ चा चित्रपटाची लोक वाट पाहत आहे. मात्र त्यांना 7 जुलै पर्यंत या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. कारण 7 जुलै 2023 ला हा चित्रपट रिलाज होणार आहे. तसेच भारतीय प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे की, हा चित्रपट इंग्रजीच नाही तर हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये ही रिलीज हेणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube