Parineeti-Raghav Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा(Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्डा(Raghav Chadda) यांनी साता जन्माच्या गाठी बांधल्या आहेत. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये परिणीती-राघवचा(Parineeti-Raghav) विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला सिनेसृष्टीसह राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून या विवाह सोहळ्याची चर्चा रंगली होती अखेर हा विवाह सोहळा पार पडला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने रचली सर्वोच्च धावसंख्या; सूर्याची तुफानी इनिंग, गिल-अय्यरची शतकं
काही दिवसांपूर्वीच दोघांचा विवाह होणार असल्याचं समोर आलं होतं. त्यानूसार 24 सप्टेंबर आज ठरल्याप्रमाणे राघव आणि परिणीती विवाह बंधनात अडकले आहेत. या विवाह सोहळ्याला अनेक कलाकारा राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी असल्याने विवाह सोहळ्यादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पंजाबराव डख यांचं ऐकलं अन्… : नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त; कथित हवामान तज्ञ पुन्हा तोंडघशी
काल २३ सप्टेंबरला दिवशी लीला पॅलेसमध्ये राघव–परिणितीचा एकत्र हळदी समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी संगीताची थीम ही ९०च्या दशकातील गाणी असणार आहे. राघव-परिणीती यांचा साखरपुडा 13 मे दिवशी पार पडला. त्यानंतर साखरपुड्याचा फोटो पोस्ट करत राघव चड्ढासाठी परिणितीने खास पोस्ट लिहिली होती.
संजय राऊत वैफल्यग्रस्त, लोकही त्यांच्या बोलण्याला किंमत देईना; गिरीश महाजनांची घणाघाती टीका
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा लग्नसोहळ्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. अशातच परिणीती आणि राघव यांच्या मेहंदी सोहळ्यातले फोटो व्हायरल झालेत. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये परिणीतीने फोटोसाठी पोझ दिलेली दिसत असुन तिच्या हातावर मेहंदी रंगली आहे.
Sharad Pawar : ‘ते’ फोटो सोशल मीडियावर का वापराले? शरद पवारांची प्रफुल्ल पटेलांकडे नाराजी
काल सकाळी परिणिती चोप्राचा चुडा भरण्याचा कार्यक्रम सकाळी १० वाजता पार पडला त्यानंतर आज दुपारी १ वाजता राघव चड्डा यांना सेहराबंदसाठी गेले, त्यानंतर वाजत-गाजत वरात घेऊन राघव लग्नाच्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं. अखेर देवा-ब्राम्हणांच्या साक्षीने दोघांनी सप्तपदीचे फेरे घेऊन विवाह बंधनात अडकले आहेत.
दरम्यान, टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिची बहीण अनम मिर्झा यांनी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही पारंपारिक पोशाखात खूपच सुंदर दिसत आहेत.