ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने रचली सर्वोच्च धावसंख्या; सूर्याची तुफानी इनिंग, गिल-अय्यरची शतकं

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने रचली सर्वोच्च धावसंख्या; सूर्याची तुफानी इनिंग, गिल-अय्यरची शतकं

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या रचली आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 399 धावांची मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाला 400 धावांचे आव्हान दिले आहे.

यापूर्वी भारताने नोव्हेंबर 2013 मध्ये बेंगळुरू वनडेमध्ये 6 विकेट्सवर 283 धावा केल्या होत्या. आजच्या इंदूर वनडेत भारतीय संघाकडून 2 शतके झळकावली आहेत. श्रेयस अय्यरने 105 धावांची तर शुभमन गिलने 104 धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवने नाबाद 72 धावा केल्या. तर कर्णधार केएल राहुलने 52 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने 2 बळी घेतले.

IND vs AUS : श्रेयस अय्यर-शुभमन गिलचे खणखणीत शतकं, दोनशे धावांची भागीदारी

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या षटकातच ऋतुराज गायकवाड केवळ आठ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, यानंतर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी दिवसभरात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी केली.

IND vs AUS : Video सुर्याने धू धू धुतलं… चार चेंडूत हाणले सलग 4 षटकार

ईशान बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आसमान दाखवले. दुसरीकडे कर्णधार केएल राहुलही मोठे फटके खेळत राहिला. सूर्याने कॅमेरून ग्रीनवर सलग चार षटकार ठोकले. दरम्यान, केएल राहुल 38 चेंडूत 52 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. तर सूर्याने एका बाजूने वेगाने धावा काढल्या.

सूर्यकुमार यादवने अवघ्या 37 चेंडूत 72 धावांची नाबाद खेळी केली. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. सूर्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 6 षटकार आले. त्याच्यासह रवींद्र जडेजा 9 चेंडूत 13 धावा करून नाबाद राहिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube