Pathan : शाहरुखचा पठाण 1000 कोटींच्या पार

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ‘पठाण’  ( Pathan )  या सिनेमाने देशात आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. या सिनेमाने जगभरता आजपर्यंत ९४६ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा आज १००० कोटींचा टप्पा पार करेल. या सिनेमात शाहरुख  खान ( Shahrukh Khan )  मुख्य भूमिकेत आहे. चौथ्या रविवारी ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर पुन्हा दमदार […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (50)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (50)

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ‘पठाण’  ( Pathan )  या सिनेमाने देशात आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. या सिनेमाने जगभरता आजपर्यंत ९४६ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा आज १००० कोटींचा टप्पा पार करेल. या सिनेमात शाहरुख  खान ( Shahrukh Khan )  मुख्य भूमिकेत आहे.

चौथ्या रविवारी ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर पुन्हा दमदार झेप घेतली. या चित्रपटाने भारतात ४.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘पठाण’ने आता एकट्या परदेशात ४५.७२ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे, तर भारतात नेट कलेक्शन ५१५.६७ कोटी  एवढे आहे. पठाण सिनेमाची  जगभरातील एकूण कमाई ९९६ कोटी एवढी आहे. त्यापैकी भारतामध्ये ६२१ कोटी तर परदेशात ३७५ कोटींची कमाई केली आहे.

पठाण आता हिंदी सिनेमाच्या इतिहासात जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे. याचबरोबर वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्सचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील आहे. या सिनेमात जॉन अब्राहम, दीपिका पदुकोन हे कलाकार देखील प्रमुख भूमिकते आहेत.

दरम्यान या सिनेमावरुन सुरुवातील वादंग पेटले होते. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकनीवरुन अनेकांनी या सिनेमाला विरोध केला होता. यानंतर सिनेमात बदल करण्यात आला. सिनेमामध्ये बदल केल्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता.

Exit mobile version