Download App

ShahRukh Khan : ‘पठाण’ चा धुमाकुळ, पहिल्याच दिवशी रेकॉर्डतोड कमाई

मुंबई : बुधवारी 25 जानेवारीला अखेर किंग खान शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. ज्या प्रमाणे या चित्रपटाकडून आपेक्षा केल्या जात होत्या. त्या खऱ्या ठरल्या आहेत. रिलीज पहिल्याच दिवशी झाल्याच्या शाहरुखच्या ‘पठाण’ (Pathaan)ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे.

यशराज बॅनरखाली तयार करण्यात आलेला पठाण या चित्रपटाने बंपर अॅडव्हान्स बुकिंग केल्याचा या चित्रपटाला खुप फायदा झाला. त्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या माहितीनुसार ‘पठाण’ने ओपनिंग डेलाच बॉक्स ऑफिसवर 55 कोटींचा बिझीनेस करत रेकॉर्डतोड कमाई केली आहे. तर आज 26 जानेवारीचा सुट्टी आणि विकेंडमुळे हा आकडा असाच वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

10 जानेवारीला पठाण या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये मुख्यभूमिकेत आहेत.जेव्हापासून या चित्रपटाचा टिझर आणि पहिले गाणे गाणे रिलीज झाले तेव्हापासून या चित्रपटावरुन बराच गदारोळ सुरू झाला होता.

अशा परिस्थितीत शाहरुख खानही त्याच्या आगामी अ‍ॅक्शन चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्याच्या तयारीत होता. ‘पठाण’ सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. त्याचा स्क्रीनप्ले श्रीधर राघवन लिहिला आहे.

2022 वर्षात, शाहरुख खानने बॉलिवूडच्या ‘ब्रह्मास्त्र’, ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ आणि ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये कॅमिओ भुमिका केल्या होत्या. तर 2023 मध्ये शाहरुख खानचे चाहते त्याला मुख्य भुमिकेत पाहू शकणार आहेत. 2023 मध्ये तो एक नाही तर तीन-तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यामध्ये ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ रिलीज होणार आहे.

Tags

follow us