Patriotic song from Matrubhumi May War Rest in Peace released features the pairing of Salman and Chitrangda : सलमान खान अभिनीत ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी देशभक्तीची भावना जागवणारे ‘जय हिंद’ हे दमदार गीत प्रदर्शित केले आहे. भव्य स्तरावर चित्रीकरण करण्यात आलेल्या या हृदयस्पर्शी गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये सलमान खान लष्करी गणवेशात अत्यंत प्रभावी अंदाजात दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला इतर लष्करी अधिकारीही पाहायला मिळतात.
विद्यार्थ्यांच्या दाखल्यांच्या खरेदी-विक्रीचा आरोप, शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
‘जय हिंद’ या गाण्याची ताकद केवळ त्यातील भव्य दृश्यांपुरती मर्यादित नसून, त्यामागील प्रामाणिक आणि मनाला भिडणारी कथाही तितकीच प्रभावी आहे. हे गाणे सैनिकांच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासोबतच सीमेवरील चौक्यांवर त्यांना कराव्या लागणाऱ्या संघर्षाची आणि त्यांच्या घरी परतण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कुटुंबीयांच्या मनातील वेदनेचीही जाणीव करून देते. या गाण्यातील प्रत्येक दृश्यातून मातृभूमीप्रती असलेला आदर, समर्पण आणि प्रेमाची भावना स्पष्टपणे जाणवते.
दिवाळीत 31 टक्के कुटुंबं खरेदीच करणार नाहीत; सर्व्हेक्षणात ग्राहकांनी सांगितला ‘मूड’
अपूर्व लाखिया दिग्दर्शित आणि सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती होत असलेल्या ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या युद्धपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सीमेवर भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याच्या सत्य घटनांपासून प्रेरित असलेल्या या चित्रपटात सलमान खान एका दमदार आणि अत्यंत प्रभावी भूमिकेत दिसणार आहे, तर चित्रांगदा सिंह त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि सुरुवातीला प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझरला प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटातील वास्तववादी मांडणी, भावनिक खोली आणि प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी दाखवलेले शौर्य यांचे विशेष कौतुक होत आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून, तो सध्या सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
अॅपलचा मोठा निर्णय! एका ग्राहकाला दोनच आयफोन; भारत-अमेरिकेत खरेदीवर मर्यादा
या चित्रपटातील गाण्यासाठी संगीतविश्वातील दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. आयकॉनिक आणि चार्टबस्टर गाणी देण्याचा विषय येतो, तेव्हा हिमेश रेशमिया आणि सलमान खान यांच्या जोडीची तुलना क्वचितच कोणाशी होऊ शकते. हिमेश रेशमिया यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले असून, समीर अंजान यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. तर स्टीबिन बेनने आपल्या सुरेल आवाजाने या गाण्याला चार चाँद लावले आहेत. प्रदर्शित होताच ‘जय हिंद’ हे गीत श्रोत्यांच्या प्लेलिस्टमध्ये स्थान मिळवण्यासाठी सज्ज झाले आहे. हे गाणे देशभरात देशभक्तीचा उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण करेल, यात शंका नाही.
