Download App

‘ओटीटीवरील आक्षेपार्ह अन् अश्लील कंटेटवर निर्बंध’? मंत्री Anurag Thakur यांनी घेतली महत्त्वाची बैठक

Anurag Thakur meeting: गेल्या काही वर्षांपासून ओटीटी (OTT) माध्यमांना सिनेमा (Cinema) आणि सिरीयलला (Serial) जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. चाहत्यांचा वाढता कल बघून अनेक दिग्गज कलाकारांनी ओटीटीवर देखील पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. (OTT content) याउलट काही कलाकारांनी ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेटबद्दल आक्षेप नोंदवत या माध्यमावर काम करण्यास स्पष्ट नकार दर्शवत असल्याचे दिसून येत आहे.

यासंदर्भात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मंगळवारी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींसोबत एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीच्या दरम्यानचे काही फोटो अनुराग ठाकूर यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. सध्याची स्थिती बघता ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह सीरिजवर अनेक बंधने घालण्याची गरज असल्याचे त्यांनी या बैठकीमध्ये सांगितले आहे. अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, “ओटीटी माध्यमांना सर्वप्रथम हे कळाले पाहिजे की, त्यांच्या सीरिज प्रत्येक वयोगटामधील प्रेक्षकवर्ग बघितला पाहिजे.

त्यामुळे याठिकाणी प्रसारित होणाऱ्या प्रत्येक सीरिजबद्दल  त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. अनुराग ठाकूर म्हणाले की, “फक्त कंटेटच्या नावाखाली सरकार केव्हाच भारतीय संस्कृती आणि समाजाचा अपमान होऊ देणार नसल्याचे यावेळी सांगितले आहे. ओटीटीच्या माध्यमांनी त्यांची प्राथमिक जबाबदारी समजून घेऊन समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी

ओटीटीला कल्पकतेचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे, अश्लीलता, आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करायचे नाही. शिवाय अनुराग ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवासाठी ‘सर्वोत्कृष्ट वेब सीरिज’ या नव्या श्रेणीची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणत्याही भारतीय भाषेमध्ये प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट वेब सीरिजला देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

Tags

follow us