Download App

….त्यांच्या आठवणी कायम जिवंत राहतील; अतुल परचुरेंच्या कुटुंबियांना पंतप्रधान मोदींचं सांत्वनपर पत्र

अशा नुकसानामुळे कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण होते. एक अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांनी मनोरंजन विश्वात स्वतःचं एक

  • Written By: Last Updated:

PM Modi Letter to Atul Parchure family : चतुरस्त्र मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं नुकतच निधन झालं आहे. तीन वर्षांपूर्वी अतुल परचुरेंना कर्करोग झाला होता, कर्करोगावर मात करून ते बाहेर आले होते. परंतु, लिव्हरच्या (यकृताच्या) कर्करोगाशी झुंजताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. नाटक, मालिका व चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अतुल यांच्या जाण्याने मराठी कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दरम्यान, अतुल परचुरे यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अतुल परचुरेंच्या कुटुंबियांना सांत्वन पत्र पाठवलं आहे.

अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाचं वृत्त मला समजलं. या वृत्ताने मला दु:ख झालं. अशा नुकसानामुळे कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण होते. एक अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांनी मनोरंजन विश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मराठी रंगभूमी, तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामगिरीने त्यांना प्रेक्षकांची वाहवा आणि आपुलकी मिळवून दिली.

Atul Parchure: आमचा अतुल गेला राज ठाकरेंची अभिनेते अतुल परचुरेंच्या निधनानंतर भावनिक पोस्ट

अतुल परचुरे यांनी आपल्या कामातून मागे सोडलेल्या अनेक आठवणी कायम जिवंत राहतील. तसंच, त्यांनी जी मुल्य रुजवली ते कायम कुटुंबाला प्रेरणा देत राहतील. कुटुंब, मित्र आणि चाहत्यांना त्यांची कायम उणीव भासेल. मात्र, अतुल हे कायम स्मरणात राहतील. अतुल यांच्या कुटुंबप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत अशा शब्दांत मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कॅन्सरवर मात करून अतुल परचुरे यांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केली होती. मराठी रंगभूमीवर पुन्हा दाखल झालेल्या सूर्याची पिल्ले या नाटकातही त्यांची भूमिका होती. पण, कॅन्सरनंतरची त्यांची इनिंग दुर्दैवानं फार काळ चालली नाही. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. अष्टपैलू अभिनेता, चांगला मित्र गमावल्याची भावना त्यांच्या सहकलाकारांनी व्यक्त केली आहे.

follow us