मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू भारत भेटीवर; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत

मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू भारत भेटीवर; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत

Maldives President Mohammad Muizzoo on India visit : मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांचं आज सोमवार (दि. ७ सप्टेंबर)रोजी सकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. मालदीवच्या राष्ट्रपती आणि प्रथम महिला साजिदा मोहम्मद यांचं आज राष्ट्रपती भवनात आगमन झाल्यानंतर (Maldives) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केलं.

Blast Karachi Airport: कराची विमानतळावर मोठा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी

राष्ट्रपती मुइझ्झू आणि साजिदा मोहम्मद यांनी नवी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. महात्मा गांधी स्मारकावर आदरांजली वाहल्यानंतर मुइझ्झू यांनी राजघाटावरील अभ्यागतांच्या पुस्तकावर स्वाक्षरीही केली. भारताच्या पहिल्या पाच दिवसीय द्विपक्षीय दौऱ्यावर असलेले मुइझू  राष्ट्रीय राजधानीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, बैठकीत जयशंकर आणि मुइझू यांनी दोन्ही देशांमधील चांगले संबंध वाढवण्यावर आणि कायम ठेवण्यावर सविस्तर चर्चा केली. दोन्ही बाजूंनी भारत सरकारद्वारे समर्थित सध्याच्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि मालदीवच्या सध्याच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांच्या अनुषंगाने अतिरिक्त मार्ग शोधण्यावर चर्चा केली, ज्यांना दोन्ही देश परस्पर फायदेशीर मानतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या