Maldives Election: मालदीवमध्ये चीन समर्थक मुइझ्झूंचा मोठा विजय! पीएनसीने 93 पैकी 66 जागा जिंकल्या

Maldives Election: मालदीवमध्ये चीन समर्थक मुइझ्झूंचा मोठा विजय! पीएनसीने 93 पैकी 66 जागा जिंकल्या

Maldives Election: मालदीवमध्ये संसदीय निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. निवडणुकीत चीन समर्थक अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू (Mohammed Muizhhu) यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेसन (People’s National Congress) जवळपास दोन तृतीयांश बहुमताने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे मालदीवमध्ये मइझ्झू यांची सत्ता आली आहे. चीनप्रेमी आणि भारतद्वेषी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांना मोठे यश मिळणं हा भारतासाठी मोठा झटका आहे.

Weather Update : कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; वातावरणात मोठा बदल 

निवडणूक निकालानुसार, 93 सदस्यीय सभागृहासाठी झालेल्या निवडणुकांपैकी 86 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. मुइझ्झू यांच्या पक्षाला 66 जागा मिळाल्या आहेत तर 6 जागा अपक्षांना गेल्या आहेत. उर्वरित सात जागांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. मुइझ्झू यांच्या पक्षाने 93 सदस्यांच्या संसदेत एक तृतीयांश जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पीएनसी पक्षाला मोठा विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला मालदीवमध्ये नवीन संसद सदस्य दिसणार आहेत.

नाबार्डमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला १ लाख रुपये मिळणार पगार, कोण करू शकतं अर्ज? 

मुइझ्झू यांच्या पीएनसीला मालदीवन डेमोक्रॅटिक पार्टीचे आव्हान होते. गेल्या निवडणुकीत मोठा विजय मिळवलेल्या या पक्षाला यावेळी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एमडीपी हा पक्ष काहीसा भारताच्या बाजूने बोलणारा आहे. पण, जनतेने त्यांना नाकारलं.

रविवारी मालदीवमध्ये निवडणूक पार पडली. मालदीवच्या पीपल्स मजलिस (संसद) साठी रविवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 8:00 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान झाले. मालदीवमधील निवडणुकीसाठी एकूण 2,07,693 लोकांनी मतदान केले. मालदीवच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी एकूण 72.96 टक्के मतदान झाले. यामध्ये 1,04,826 पुरुष आणि 1,02,867 महिलांचा समावेश आहे. यापूर्वी 2009 मध्ये 78.15 टक्के लोकांनी मतदान केले होते, 2014 मध्ये 78.80 टक्के आणि 2019 मध्ये 81.80 टक्के लोकांनी मतदान केले होते.

दरम्यान, संसदेत बहुमत नसल्यामुळे मुइझ्झू यांना यांना नवीन कायदे करण्यात अडचणी येत होत्या. आता मात्र, बहुमत प्राप्त झाल्यानं त्यांना कायदे पारित करण्यासाठी काही अडचणी येणार नाही.

चीनशी असलेले संबंध आणखी दृढ होणार
मुइझ्झू यांनी चीनशी असलेले आर्थिक संबंध आणखी दृढ केले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी भारताऐवजी चीनला भेट देण्यास प्राधान्य दिले. शिवाय, मुइझ्झू यांची धोरणे चीनधार्जीणे राहिली आहेत. त्यामुळं भारताची डोकेदुखी वाढू शकते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube