पहिल्याच आठवड्यात मालदीवमधून भारतीय सैन्य हुसकावून लावणार; मोहम्मद मुइझ्झू यांची घोषणा

  • Written By: Published:
पहिल्याच आठवड्यात मालदीवमधून भारतीय सैन्य हुसकावून लावणार; मोहम्मद मुइझ्झू यांची घोषणा

Mohamed Muizzu on Indian Army : मालदीवच्या (Maldives) निवडणुकीत भारत आणि चीन यांच्यातील वर्चस्वाची लढाई दिसून येत होती. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते मोहम्मद मुइझ्झू ( Mohamed Muizzu) हे विजयी झाले. तर विद्यमान अध्यक्ष इब्राहिम सोलिह (Ibrahim Solih) यांचा या निवडणुकीत पराभव झाला. मोहम्मद मुइझ्झू यांच्या विजयानंतर चीनचा प्रभाव वाढेल असे मानले जातं आहे. दरम्यान, पदभार स्वीकारण्यापूर्वीच मोहम्मद मुइझ्झू यांनी एक मोठं विधान केलं. भारतीय सेनेला परत पाठवू, असा इशारा त्यांनी दिला.

गेल्या आठवड्यात चीन धार्जिणे मोहम्मद मुइझ्झू हे मालदीवची निवडणूक जिंकेले. ते पुढील महिन्यात औपचारिकपणे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. दरम्यान, त्यांनी अल जझीराला एक मुलाखती दिली. यात ते म्हणाले की, जर शक्य असेल तर अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच आठवड्यातच भारतीय सेनेला हुसकावून लावेन. भारतीय सेनेला परत पाठवणे हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं ते म्हणाले.

Sam Bahadur: अखेर प्रतीक्षा संपली! विकी कौशलचा बहुचर्चित ‘सॅम बहादुर’ हा सिनेमा ‘या’ दिवशी येणार भेटीला 

मुइझ्झू यांचा कल चीनकडे आहे. ते पुढं म्हणाले की, राजनैतिक पध्दतीने हा मुद्दा सोडवला जाईल. शक्य झाले तर राष्ट्राध्यक्ष पद हाती घेण्यापूर्वीच्या आठवड्याभरातच भारतीय सेनेला परत पाठवले जाईल. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असं ते म्हणाले.

ते म्हणाले, मी काही दिवसांपूर्वी भारतीय उच्चायुक्तांना भेटलो होतो आणि त्या भेटीतच म्हणालो होतो की, या समस्येला आमचे सर्वोच्च प्राधान्य देणं आवश्यक आहे. त्यांनी याचा सकारात्मक विचार केला. या मुद्द्यावर पुढं जाण्यासाठी सोबत काम करू असं आश्वासनं दिलं, असं मोहम्मद मुइझ्झू यांनी सांगिले.

‘आम्हाला सुरक्षित वाटत नाही’

मुइझ्झू म्हणाले, मालदीव हा अनेक शतकांपासून शांतताप्रिय देश आहे. आमच्या भूमीवर कधीही परकीय सैन्य आले नाही. आमच्याकडे कोणतीही मोठी लष्करी पायाभूत सुविधा नाही आणि आमच्या भूमीवर कोणत्याही सैन्याच्या उपस्थितीने आम्हाला सुरक्षित वाटत नाही, असं ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube