नव्या वादाची ठिणगी! ‘या’ देशाच्या नागरिकांना मालदीवमध्ये नो एन्ट्री; कारण काय?

नव्या वादाची ठिणगी! ‘या’ देशाच्या नागरिकांना मालदीवमध्ये नो एन्ट्री; कारण काय?

Maldives Israel Ban : रविवारचा दिवस मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयात अनेक घडामोडींचा ठरला. एकामागोमाग एक महत्वाच्या (Maldives Israel Ban) बैठका झाल्या. यानंतर चीनच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या मालदीव सरकारने मोठी घोषणा केली. ही घोषणा भारताबाबत झालेली नाही तर सरकारने इस्त्रायली नागरिकांना देशात एन्ट्री बॅन केली आहे. या निर्णयानंतर आता इस्त्रायलचे नागरिक मालदीवमध्ये येऊ शकणार नाहीत. गाझात इस्त्रायलकडून जे हल्ले केले जात आहेत त्याचा विरोध म्हणून मालदीवने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

India Maldives : मालदीवमधून भारतीय सैनिकांची वापसी, कर्मचाऱ्यांची एन्ट्री; नवा प्लॅन काय?

मालदीव सरकार आता इस्त्रायली पासपोर्टधारक नागरिकांची एन्ट्री बॅन करण्यासाठी कायद्यातही बदल करणार आहे. सन एमवीच्या वृत्तानुसार गाझात इस्त्रायलकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे लोकांत असंतोष वाढत चालला आहे. त्यामुळे मालदीव सरकारने हा निर्णय घेतला आहे. रविवारी राष्ट्रपती मुइज्जू यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. इस्त्रायली पासपोर्ट धारकांना मालदीवमध्ये येण्यास प्रतिबंध करण्यासाठी कायद्यात बदल केला जाईल. यासाठी कॅबिनेट मंत्र्यांची विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती यावर वेगाने कार्यवाही करणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube