India Maldives : मालदीवमधून भारतीय सैनिकांची वापसी, कर्मचाऱ्यांची एन्ट्री; नवा प्लॅन काय?

India Maldives : मालदीवमधून भारतीय सैनिकांची वापसी, कर्मचाऱ्यांची एन्ट्री; नवा प्लॅन काय?

India Maldives Tension : भारत आणि मालदीवमधील तणाव कायम (India Maldives Tension) आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांनी आमच्या देशातून माघारी जावे असे सांगितले होते. त्यानंतर मालदीवच्या (Maldives) अड्डू विमानतळावरील भारतीय सैनिकांची पहिली तुकडी भारतात येण्यासाठी रवाना झाली. भारतीय सैनिकांनी हेलिकॉप्ट ऑपरेटरचे काम भारतातून आलेल्या तांत्रिक पथकाकडे दिले. मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सच्या मीडिया अधिकाऱ्याने अधाधू वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, की अड्डू शहरात तैनात असलेले भारतीय सैनिक आता भारतात परतले आहेत. मालदीवचे मुइज्जू सरकार ही राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांचा विजय असल्याचे प्रचारीत करत आहे.

तसं पाहिलं तर मुइज्जू यांनी याच मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. यानंतर त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचे सांगितले जात आहे. मुइज्जू यांना चीन समर्थक मानले जाते. राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर मुइज्जू भारतीय सैनिकांच्या माघारीसाठी प्रयत्न करत होते. अनेकदा चर्चा झाल्यानंतर माले आणि नवी दिल्ली यांच्यात लष्करी जवानांच्या जागी नागरी सेवेतील कर्मचारी तैनात करण्याबाबत चर्चा झाली. याआधी मुइज्जू म्हणाले होते की भारतातील एकही व्यक्ती मालदीवमध्ये सिव्हील ड्रेसमध्ये असणार नाही.

India Maldives Conflict : आमच्याकडे भारतीय सैन्य नाहीच; मदत नाकारत मालदीवचा पुन्हा भारतविरोधी सूर

याआधी भारतीय नागरिकांची एक टीम 26 फेब्रुवारी रोजी अड्डू विमानतळावर पोहोचली होती. आता या टीमने भारतीय जवानांकडून हेलिकॉप्टर संचालनाचं काम हाती घेतलं आहे. या पथकात 26 जणांचा समावेश आहे. मालदीव किंवा भारत सरकारच्या कोणत्याही विभागाने अद्याप या कर्मचाऱ्यांबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

अड्डू शहरात तैनात असलेले हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी भारतात आणण्यात आल्याने भारताने नुकतेच मालदीवमध्ये नवीन हेलिकॉप्टर पाठवले आहे. भारताने मालदीवला तीन विमाने भेट म्हणून दिली आहेत. यामध्ये एक हेलिकॉप्टर, एक डॉर्नियर विमान आणि ऑफशोअर पेट्रोलिंग व्हेसल यांचा समावेश आहे. या विमानांच्या माध्यमातून भारत मालदीवच्या लोकांना आणि लष्कराला मदत करतो.

मालदीवमधून भारतीय सैनिकांची वापसी हा काही मालदीवच्या मुइज्जू सरकारचा विजय नाही, असे विदेश नीतीच्या जाणकारांचे म्हणणे आहे. कारण, भारताने आपल्या सर्व प्लॅटफॉर्मची कार्यवाही सुरू ठेवली आहे. भारतीय सैनिक माघारी आले तरीही भारतीय नागरी सेवेतील कर्मचारी तेथे राहणार आहेत.

अशात जर चीन मालदीवमध्ये आपल्या सैन्यासाठी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला तर भारतीय कर्मचारी याची माहिती देऊ शकतील. मुइज्जू सरकारने पहिल्या सैनिकांच्या तुकडीसाठी 10 मार्चची मुदत दिली होती. त्यानंतर 10 मे पर्यंत सर्व सैनिकांनी भारतात माघारी जावे, असे सांगितले होते.

India Maldives : दणका बसलाच! मालदीवला रोज 9 कोटींचं नुकसान; भारतीयांसाठी घेतला ‘खास’ निर्णय

follow us
  • fb
  • instagram
  • youtube