Pathaan वर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य, शाहरूखच्या फॅन्सकडून कमेंटचा पाऊस

नवी दिल्ली : स्पाय थ्रिलर चित्रपट ‘पठान’ बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. शाहरुख खान स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे. चित्रपट रिलीज होऊन 15 दिवस झाले आहेत. तरी देखील थिअटरमध्ये ‘पठान’ ची गर्दी कमी झालेली नाही. त्यामुळे शाहरुख खानचा कमबॅक चित्रपट ‘पठान’ बॉलिवूडची सुपर सक्सेसफुल चित्रपट ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

Untitled Design   2023 02 09T175838.894

Untitled Design 2023 02 09T175838.894

नवी दिल्ली : स्पाय थ्रिलर चित्रपट ‘पठान’ बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. शाहरुख खान स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे. चित्रपट रिलीज होऊन 15 दिवस झाले आहेत. तरी देखील थिअटरमध्ये ‘पठान’ ची गर्दी कमी झालेली नाही. त्यामुळे शाहरुख खानचा कमबॅक चित्रपट ‘पठान’ बॉलिवूडची सुपर सक्सेसफुल चित्रपट ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पठानचं कौतुक केलं आहे.

लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पठान’ चं कौतुक केलं. त्यांनी पठानच्या प्रेक्षकांवरील प्रभावाबद्दल ते बोलले ते म्हणाले, ‘श्रीनगरमध्ये चित्रपटगृह प्रेक्षकांनी हाऊसफुल झाले आहेत.’ तर पंतप्रधान मोदींनी थेट संसदेत शाहरूखच्या पठानचं कौतुक केल्यानंतर शाहरूखच्या फॅन्सकडून कमेंटचा पाऊस पाडण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘संपूर्ण देश पाहतोय’, छाती थोपटत मोदींचा विरोधकांवर निशाणा

पंतप्रधान मोदींचं भाषण व्हायरल झाल्यानंतर एका यूजरने कमेंटमध्ये लिहीले की, ‘ही SRK ची पॉवर आहे की, पंतप्रधान मोदींनाही हैरान कलं आहे. पठानमूवीने शाहडम.’ तर दुसऱ्यास एका कमेंटमध्ये लिहीले की, ‘नकारात्मकता पसरवण्यासाठी आता तुम्ही काय करणार ? आमचे माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांनी देखील चित्रपटगृह हाऊसफुल्ल असल्याची पुष्टी केली आहे!’ दुसर्‍या वापरकर्त्याने कमेंट केली, ‘तुमचा बहिष्कार काय असेल… बनावट संकलनाचे नारे… अब तो पीएम बोल रहे है…’

Exit mobile version