PM MODI : ‘संपूर्ण देश पाहतोय’, छाती थोपटत मोदींचा विरोधकांवर निशाणा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी आज राज्यसभेत ( Rajyasabha ) बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांच्या अभिभाषणावर राज्यसभेत बोलत होते. त्यांनी जवळपास 85 मिनीटे भाषण केले. भाषणादरम्यान त्यांनी विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले.
यावेळी विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले की, ‘सभापतीजी संपूर्ण देश पाहतोय एक व्यक्ती किती जणावंर भारी पडतोय’, असे म्हणत त्यांनी आपली छाती देखील थोपटली. तसेच विरोधी पक्षातील खासदारांना घोषणा देण्यासाठी आळीपाळने बदलावे लागत आहे. विरोधी पक्षातील प्रत्येक जण आलटून पालटून दोन- दोन मिनीटे घोषणा देत आहे. याउलट सत्ताधारी पक्षाच्या बाजूने गेल्या तासभरापासून तसूभरही आवाज कमी झालेला नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
राज्यसभेत पंतप्रधान मोदी बोलत असताना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर या गदारोळात देखील मोदींनी विरोधकांवर विविध मुद्द्यांवरुन निशाणा साधला. नेहरु-गांधी कुटूंब, कलम 356, महागाई-बेरोजगारी इ. विषयांवरुन त्यांनी विरोधकांना फैलावर घेतले. ज्यांना अर्थनिती समजत नाही त्यांनी त्याला अनर्थ निती मध्ये बदलले असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी बोलताना त्यांनी ज्यांच्याकडे चिखल होता त्यांनी तो टाकला, माझ्याकडे गुलाल होता तो मी उधळला, अशी शायरी देखील म्हटली.
काल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण केले होते. त्यावेळी देखील त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता. परंतु विरोधकांनी मात्र मोदी यांनी अदानी यांच्या प्रश्नावर कोणतेही उत्तर दिले नाही. मोदी व अदानी यांचे संबंध काय असा प्रश्न देखील उपस्थित केला.